Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणातील पाणी प्रदूषणाच्या विळख्यात

Ujani Dharan : सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील वाढते पाणी प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे.

Team Agrowon

राजाराम माने

Ujani Dam Solapur News : सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील वाढते पाणी प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. आज मानवासह पशूपक्षी, प्राणी व सर्वच जलचर, उभयचर प्राणी या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून, जीवन- मरणाचा संघर्ष करीत आहेत.

त्यापैकी अनेक मासळींच्या जातीही नष्ट झाल्या आहेत. यामुळे ‘उजनी धरणातील पाणी शाप की वरदान’ बनले आहे .

राज्यातील गोड्या पाण्याचे सर्वांत मोठे आगार व सर्वांत मोठा म्हणजे ६३ टीएमसी मृतसाठा असणारे धरण म्हणून उजनीकडे पाहिले जात होते.

मात्र, बदलत्या धोरणानुसार राजकारण्यांनी विकासाच्या नावाखाली गेल्या ३०-४० वर्षांच्या काळात धरणालगतच्या परिसरात अनेक साखर कारखाने, केमिकलयुक्त कंपन्या, छोटे- मोठे उद्योग, कारखाने उजनी धरणातील पाण्याच्या आधारावर आणून बसवले आहेत. मात्र, या कारखान्यांनी उजनीतून स्वच्छ काचेप्रमाणे दिसणारे पाणी उचलले व धरणात घाण व केमिकलयुक्त पाणी सोडले.

त्याचबरोबर कुरकुंभ एमआयडीसीसह पुणे व पिंपरी- चिंचवडसारख्या मोठ्या शहरांतील नागरिकांची हजारो- लाखो टन विष्ठा प्रतिवर्षी धरणात येऊन साठत, त्याचबरोबर घरातील व इतर ठिकाणचे सांडपाणी, घाण, कचरा व इतर राडारोडा आजही प्रत्येकजण नदीतच आणून टाकत आहेत.

यामुळे नेहमीच सर्वांना स्वच्छ पाणी देणारी उजनी माय आता या रोजच्या मानवाच्या चुकांना कंटाळून मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.

उजनी प्रदूषित झालेली आहे, हे माहीत असतानाही संपूर्ण सोलापूर जिल्हा याच उजनीतील प्रदूषित पाणी पीत आहे. दरवर्षी आषाढी वारीला राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरला विठुमाउलीच्या भेटीला व दर्शनासाठी जात असतात.

त्यावेळी तेथील सर्वच भाविक- भक्तजण याच उजनीतील प्रदूषित पाण्यात तोंड धुणे, स्नान करण्यासह पिण्यासाठी हेच पाणी वापरतात. यामुळे बहुतांश नागरिक विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त होत आहेत. तसेच दरवर्षी पाऊस झाल्यानंतर उजनी धरणात येणारे पाणी प्रदूषित आणि फेसाळलेले असते.

धरण भरल्यावर दिवाळीनंतर पाण्यावर गडद पोपटी रंगाचा छटा दिसतात व पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त वास मारत असते. यामुळे बाहेर धरण अतिशय सुंदर वाटत असले तरी प्रत्यक्षात पाण्याकडे पाहिल्यास पाण्यात उतरण्याचे धाडस कोणीही करणार नाही, अशी विदारक परिस्थिती असते.

धरणातील गाळ काढणे आवश्‍यक

दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा भूजलतज्ज्ञ श्रीनिवास वडगबाळकर म्हणतात, उजनी धरणातील प्रदूषण हे धरणातील पाणीसाठा मृतसाठ्यात गेल्यानंतर जास्त प्रमाणात दिसून येते. इतर धरणांप्रमाणेच उजनी धरणातील मृतसाठा काढण्याची सोय नाही. मृतसाठा म्हणजे निर्जीव साठा असून, यामध्ये गाळाचे प्रमाण जास्त आहे व दरवर्षी या गाळामध्ये वाढच होत आहे.

सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी म्हणून नावारूपाला आलेले उजनी धरण आता शाप ठरत आहे. दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या पाण्याच्या दर्जाबाबत अनेक वेळा संशोधकांनी लक्षात आणून देऊनसुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. जलाशयातील पाणी पूर्ण प्रदूषित झाल्याने अनेक समस्या उद्‌भवत आहेत. या बाबींकडे लक्ष नाही दिले तर भविष्यात प्रदूषित पाणी मानवी समाजाबरोबर पाळीव प्राण्यांनाही मारक ठरेल.‌
डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक व निरीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT