Agrowon Sanvad Agrowon
ॲग्रो विशेष

Ai in Agriculture: केळीसाठी ‘एआय’चा वापर महत्त्वाचा

Banana Farming: जुन्नर येथे आयोजित परिसंवादात ‘केळी पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य’ असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. केळी निर्यातीसाठी युरोपीय बाजारपेठेचा मार्गही आता खुला होतोय.

Team Agrowon

Junnar News: ‘‘प्रत्येक पाच किलोमीटरवर वातावरण आणि जमिनीत बदल आढळतो. त्यामुळे आता केळी पिकासाठी ‘एआय’ आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तापमान, हवेचा वेग, वातावरणातील आर्द्रता, पाण्याचे प्रमाण, पाण्यातील घटक व जमिनीतील पाण्याचे प्रमाण आदी बाबींची माहिती एआय तंत्रज्ञानातून मिळणार आहे,’’ असे मत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ भरत टेमकर यांनी व्यक्त केले.

मांजरवाडी (ता.जुन्नर) येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवनच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता.१८) शाश्वत केळी उत्पादन व निर्यातक्षम लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्याचे ॲग्रोवन आणि डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीतर्फे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे होते.

या वेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर खोकराळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवदास विधाटे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, कात्रज डेअरीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, माजी कृषी अधिकारी डी. एन. गायकवाड मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे संचालक शिवाजी कांबळे, शाश्वत फार्मिंगचे मंगेश भास्कर, डेक्कन व्हॅली फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष अजय बेल्हेकर,

नारायणगाव मंडल कृषी अधिकारी राणू आंबेकर, केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माऊली खंडागळे म्हणाले की, ‘‘जुन्नर, आंबेगावची माती केळी पिकासाठी अत्यंत पोषक आहे. शेतीमध्ये प्रगती नव्हती तेव्हापासून जुन्नरची केळी भारतासह विदेशातही जात होती. केळी पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून अनुदान दिले जात आहे.’’ डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वामन यांनी बोलताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील केळीच्या सद्यस्थितीबाबत मार्गदर्शन केले.

रवींद्र थोरात, विजय थोरात, श्याम भोर, शिवाजी कांबळे, सुनील वामन यांचा उत्कृष्ट केळी पीक घेतल्याबद्दल तसेच मनीष मोरडे, डॉ.विशाल थोरात, सुधीर खोकराळे, गणेश पानमंद, जयश्री खंडागळे यांचा उत्कृष्ट दुग्धव्यवसायाबद्दल ॲग्रोवनच्या वतीने सन्मान करण्यात आला. विनायक मुळे यांनी सूत्रसंचालन केले. गोकूळ कदम यांनी आभार व्यक्त केले.

लवकरच युरोपियन देशांमध्ये केळीची निर्यात

खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर या भागातील ५ हजार केळी उत्पादक शेतकरी डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्यूसर कंपनीद्वारे जोडले जाणार आहेत. सध्या आखाती देशात केळी निर्यात केली जात आहे, लवकरच युरोपियन देशांमध्ये देखील केळी निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांनी गेल्यावर्षी ‘डेक्कन व्हॅली’ द्वारे २७ कंटेनर पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या क्लस्टर विकासाची जबाबदारी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत ‘डेक्कन व्हॅली’कडे दिली आहेे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : जमीन आरोग्य जपल्यास भारतातही ब्राझीलइतकी कापूस उत्पादकता

Ragi Cultivation : नाचणी पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ नको, आमची शेतीच हवी

Solar Project : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात दहा सौर प्रकल्प

Dattatray Bharane : क्रीडा खात्याचे बरे होते, लय त्रास नव्हता; आता त्रास घ्यावाच लागेल

SCROLL FOR NEXT