Water Resources Agrowon
ॲग्रो विशेष

Water Reservoirs : मराठवाड्यात अकरा मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ६५ टीएमसीवर

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ६५.२५ टीएमसीवर पोहोचला आहे. जो एकूण उपयुक्त पाणी साठ्याच्या तुलनेत ३५.८४ टक्के आहे. या सर्व ११ प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा आताच्या घडीला १२४.९९ टीएमसी झाला आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता १८२.०५४ टीएमसी आहे. त्या तुलनेत २० ऑगस्टअखेर ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी याच तारखेला ११ मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ७७.८८ टीएमसी होता. जायकवाडी या सर्वांत मोठ्या ७६.६५७ टीएमसी उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता असलेल्या प्रकल्पात आताच्या घडीला ५०.०९४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा २४.३ टीएमसी आहे. निम्न तेरणा प्रकल्पाची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ८.५५२ टीएमसी असून या प्रकल्पामध्ये ४.८१३ टीएमसी एकूण तर १.१९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

जो १३.९१ टक्के आहे. येलदरी प्रकल्पाची एकूण उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता २८.५६९ टीएमसी असून प्रकल्पामध्ये आताच्या घडीला १४.७५४ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. ज्यामध्ये १०.३५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. हा उपयुक्त पाणीसाठा क्षमतेच्या ३६.२४ टक्के आहे.

सिद्धेश्वर प्रकल्पाची एकूण उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता २.८५९ टीएमसी असून प्रकल्पात आताच्या घडीला ७.७९ टीएमसी एकूण व १.८० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जो उपयुक्त पाणी साठ्याच्या क्षमतेच्या ६२.९६ टक्के आहे.

मांजरा प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता ६.२४९ टीएमसी असून प्रकल्पात २.५०५ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे. यामध्ये ०.८४ टीएमसी उपयुक्त पाणी साठ्याचा समावेश आहे. हा उपयुक्त पाणीसाठा क्षमतेच्या १३.४५ टक्के इतका आहे.

पेनगंगा प्रकल्पाची एकूण उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता ३४.०४२ टीएमसी असून प्रकल्पामध्ये ३०.६३६ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये १९.५१ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

जो उपयुक्त पाणी साठ्याच्या क्षमतेच्या ५७.३२ टक्के इतका आहे. मानार प्रकल्पाची एकूण उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता ४.८८ टीएमसी असून प्रकल्पात ४.४३५ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे.

यामध्ये ४.१३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश असून तो उपयुक्त पाणीसाठाच्या क्षमतेच्या ८४.५७ टक्के इतका आहे. निम्न तेरणा प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता ३.२२ टीएमसी आहे.

या प्रकल्पात २.०६३ इतका पाणीसाठा झाला असून यामध्ये १.०१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. हा उपयुक्त पाणीसाठा क्षमतेच्या ३१.२१ टक्के आहे. विष्णुपुरी प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २.८५३ टीएमसी असून प्रकल्पात ४.४८४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये २.३९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश असून तो उपयुक्त पाणीसाठा क्षमतेच्या ८३.६५ टक्के आहे.

माजलगाव, सीनाकोळेगाव प्रकल्प तहानलेलेच

माजलगाव प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता ११.०१७ टीएमसी असून प्रकल्पात आताच्या घडीला ४.११७ टीएमसी पाणीसाठा आहे. हा प्रकल्प मृतसाठ्यात असून प्रकल्पाची तहान कायम आहे.

माजलगाव प्रमाणेच सीनाकोळेगाव प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहे. या प्रकल्पाची एकूण उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३.१५ टीएमसी असून प्रकल्पात आताच्या घडीला १.२९३ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT