Akola News : गेल्या काही दिवसात अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वाण या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याची सातत्याने आवक सुरू असल्याने त्याचा फायदा झाला आहे. ‘काटेपूर्णा’ ९१.१२ टक्के भरला. तर ‘वाण’चीही ७२ टक्क्यांकडे वाटचाल सुरू झाली आहे. हे दोन्ही प्रकल्प पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामात सिंचनासाठी मोठे लाभदायक ठरतात.
यंदा काटेपूर्णा प्रकल्प जुलैमध्ये भरण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत या प्रकल्पात वेगाने साठा वाढत गेला. परिणामी पुढील काळातील पाऊस लक्षात घेता विशिष्ट क्षमतेएवढे पाणी टिकवत उर्वरित पाण्याचा दोन-तीन वेळा विसर्ग करण्यात आला. सोमवारी (ता.१९) या प्रकल्पात ७८.६८ दलघमी म्हणजेच ८६.३५ दलघमीच्या तुलनेत ९१.१२ टक्के साठा तयार झाला होता. या प्रकल्पात ३४६.२८ मिटर एवढी आजची पातळी होती. वाण प्रकल्पात ८१.९५ दलघमीच्या तुलनेत ५८.३८ दलघमी म्हणजेच ७१.२३ टक्के साठा बनलेला आहे. ४०६.४६ मिटर एवढी पातळी आहे.
या प्रकल्पात सातपुडा पर्वत रांगामधून पाण्याची आवक होते. धऱण क्षेत्रात आतापर्यंत ५४४ मिलिमीटर एवढा पाऊस झालेला आहे. छोट्या प्रकल्पांमध्येही साठ्यात वाढीची गती यंदा चांगली राहलेली आहे. मध्यम असलेल्या मोर्णा प्रकल्पात सोमवारी ४०.३८ दलघमी साठा झाला होता. या प्रकल्पाची ४१.४६ दलघमी क्षमता असून तुलनेत ९७.४० टक्के साठा तयार झालेला आहे.
निर्गुणा मध्यप्रकल्पात २८.८५ दलघमी साठा झाला असून हा प्रकल्प १०० टक्के भरला. उमा मध्यम प्रकल्पात ११.६८ दलघमीच्या तुलनेत ५.३९ दलघमी साठा तयार झालेला आहे. दगडपारवा ९०.२० टक्के तर पोपटखेड ८२.०६ टक्के भरला आहे. हे प्रकल्प आॅगस्टमध्येच तुडूंब झाल्याने पावसाच्या उर्वरित दीड महिन्याच्या कालावधीत आणखी पाण्याची आवक निश्चित मानली जात आहे. यंदा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच रब्बीसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस
तालुका पडलेला पाऊस टक्केवारी
अकोट ६३६
(सरासरी ४७९) १३३
तेल्हारा ४६९ (४६१.८) १०१.७
बाळापूर ५२८ (४३६) १२१.२
पातूर ६२२ (५९०) १०५.३
अकोला ५३१ (४८७) १०९
बार्शीटाकळी ५७३ (४९५) ११५.७
मूर्तिजापूर ५०४ (५०१) १००.५
जिल्हा ५४९.३
(४९२.२) १११.६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.