Dr. Trivedi Dutt Agrowon
ॲग्रो विशेष

Technique of Veterinary Institute : पशुचिकित्सा संस्थेचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे

Dr. Trivedi Dutt : ‘‘भारतीय पशुचिकित्सा संस्थेकडून विकसित विविध संशोधनांचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल,’’ असे मत भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. त्रिवेदी दत्त यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Pune News : ‘‘भारतीय पशुचिकित्सा संस्थेकडून विकसित विविध संशोधनांचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. येत्या काळात या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांनी पुढाकार घेऊन हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल,’’ असे मत भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. त्रिवेदी दत्त यांनी व्यक्त केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेच्या वतीने उद्योजक, शैक्षणिक संशोधनाची समन्वय बैठक शुक्रवारी (ता.१२) पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालय येथे झाली. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेचे सहसंचालक डॉ. एस. के सिंग, डॉ. रूपसी तिवारी, डॉ. पी. धर, पशुसंवर्धन विभागाचे माजी उपायुक्त डॉ. धनंजय परकाळे आदी उपस्थित होते.

दत्त म्हणाले, ‘‘खासगी कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रात ज्ञान मिळविलेल्या तज्ज्ञांना संस्थेशी जोडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संस्थेने काही पदांच्या नियुक्त्या करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल. याशिवाय कंपन्यांनी संस्थेने आंतरवासिता तत्वावर (इंटर्नशिप) विद्यार्थी घेऊन संशोधनावर भर द्यावा.

हे करताना ‘पीपीपी मोड’द्वारे करारबद्ध संशोधन करण्यास प्रोत्साहन द्यावे.’’
‘‘सध्या पशूंवर संशोधन करणे, शेतकऱ्यांचे राहणीमान उंचाविणे व पशुधनाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक लागणारा निधी विविध कंपन्यांनी त्यांच्या ‘सीएसआर’ फंडातून द्यावा,’’ असे आवाहनही दत्त यांनी केले.

डॉ. वसेकर म्हणाले,‘‘सध्या विभागाला सीसीपीपी या रोगाची लस अत्यंत आवश्यक आहे. ती संस्थेने तातडीने उपलब्ध करून द्यावी. तसेच जनावरांमध्ये एचएस, बीक्यू, आरडी, थैलेरिओसीस, रेबीज या लशीच्या गुणात्मक चाचण्या करून करून द्याव्यात. सरकारला लागणाऱ्या टीबी, जेडी आणि ब्रुसेला या आजारांचे निदान करण्यासाठी लागणारे साहित्य द्यावे, अशी मागणी संस्थेच्या संचालकांकडे केली.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT