Agriculture Compensation : एक लाखावर शेतकऱ्यांना १४४ कोटींची भरपाई मंजूर

Agriculture Loss of Farmer : दोन महिन्यांपूर्वी (नोव्हेंबर २०२३) मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी नाशिक विभागात एक लाख सात हजार ४९१ शेतकऱ्यांना नुकसानीपोटी १४४ कोटी १० लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Agriculture Compensation
Agriculture CompensationAgrowon
Published on
Updated on

Nagar News : दोन महिन्यांपूर्वी (नोव्हेंबर २०२३) मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी नाशिक विभागात एक लाख सात हजार ४९१ शेतकऱ्यांना नुकसानीपोटी १४४ कोटी १० लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. पावसासह गारपिटीने नाशिक जिल्ह्यात ६५ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ९५२ हेक्टरवर, नगर जिल्ह्यात २१ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९५६ हेक्टरवर, धुळे जिल्ह्यात ७३२ शेतकऱ्यांचे २९३ हेक्टरवर,

Agriculture Compensation
Crop Damage Compensation : बहूजमीनधारक शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीपासून वंचित

जळगाव जिल्ह्यात १३ हजार ४७१ शेतकऱ्यांचे ५ हजार ८०३ व नंदुरबार जिल्ह्यात ५ हजार ७४६ शेतकऱ्यांचे २८५१ हेक्टरवर नुकसान झाले होते. या पावसाने फळबागा, कांदा, द्राक्षांसह रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. चारा पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त भागात प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात जनावरांना चारा दिला होता.

Agriculture Compensation
Crop Damage Compensation : ‘स्वाक्षरी’ नसल्यावरून भरपाई रेंगाळली

नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्याला या पाऊस व गारपिटीचा मोठा फटका बसला होता. मात्र नुकसान भरपाई देण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पारनेरमधील सांगवी सूर्या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. अखेर नगरसह नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांसाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय मंजूर निधी (रुपये)

नाशिक ९९ कोटी ७८ लाख ६० हजार

नगर २८ कोटी ३७ लाख ३५ हजार

धुळे ७९ लाख १९ हजार

नंदुरबार ४ कोटी २० लाख ४३ हजार

जळगाव १० कोटी २० लाख ९ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com