Digital Multimedia Exhibition  Agrowon
ॲग्रो विशेष

Digital Multimedia Exhibition : मल्टिमीडिया प्रदर्शनातून उलगडली भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा

Exhibition Update : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वपूर्ण घटनावर आधारित तीन दिवसीय डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : भारतीय स्वातंत्र्य महोत्सव, हर घर तिरंगा आणि विभाजन विभिषिका स्मृति दिवस निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि मध्य रेल्वे सोलापूर विभाग यांच्या वतीने सोलापूर रेल्वे स्टेशनमधील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वपूर्ण घटनावर आधारित तीन दिवसीय डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथाच जणू उलगडली गेली आहे. याबाबत अधिक माहिती देताना क्षेत्रीय प्रचार अधिकरी अंकुश चव्हाण म्हणाले. १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते रात्री नऊपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सदर प्रदर्शनामध्ये १८५७ ते १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना, ऐतिहासिक स्थळे, सोलापुरातील चार हुतात्मे, सेल्फी बूथ, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकुरासहित माहिती असणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल रेल्वे प्रवासी आणि सामान्य नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

Gramin Bharat Festival: ग्रामीण भारत महोत्सव एक आदर्श उपक्रम

Onion Farmers Protest: कानगाव येथे कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे

Market Committees Nationalization: राष्ट्रीय बाजाराची अधिसूचना १५ दिवसांत : पणनमंत्री रावल

Jaykumar Rawal: ‘एनआयपीएचटी’मध्ये जागतिक पातळीवरील प्रशिक्षण द्या

SCROLL FOR NEXT