Colleges of Nursing Agrowon
ॲग्रो विशेष

Colleges of Nursing : राज्यात होणार सहा नवीन नर्सिंग महाविद्यालये; लातूर, बारामती, सांगलीसह या तीन जिल्ह्यांच्या समावेश

State Cabinet Decision : राज्यात परिचारिकांच्या कमतेरतेमुळे आरोग्य विभागात अनेक वेळा सावळा गोंधळ दिसून येतो. यावरून सरकारवर जोरदार टीका देखील झाली आहे. यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेताना राज्यात सहा नवीन नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देत ते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये कधी डॉक्टर आणि कधी परिचारिकांच्या कमी संख्येमुळे गोंधळ उडालेला आहे. तर परिचारिकांच्या जागा भरून ताण कमी करा असे म्हणत विविध जिल्ह्यात परिचारिकांनी आंदोलने देखील केली आहेत. यावरून राज्य मंत्रिमंडळाने नर्सिंग महाविद्यालयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सांगली (मिरज), लातूर, बारामती, जळगांव, नंदुरबार व गोंदिया अशा सहा ठिकाणी प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचारिका (नर्सिंग) महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही महाविद्यालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असतील.

सध्या अनेक ठिकाणी संसर्गजन्य आजारांचा फैलाव होताना दिसत आहे. तर ते आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग काम करत असते. अशा वेळी पॅरा वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. यासाठी राज्यात नवीन नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. जी राज्यातील सहा ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असतील.

या सहा महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे १७३ कोटी ८८ लाख इतका खर्च केला जाणार आहे. तर पाचव्या वर्षापासून यात बदल केला जाणार असून प्रतिवर्ष सुमारे १३ कोटी ९९ लाख इतका निधी दिला जाणार आहे.

नंदुरबार व गोंदिया येथील महाविद्यालयासाठी १० कोटी इतका खर्च असेल. केंद्राच्या योजनेतून ६० टक्के निधी म्हणजे ६ कोटी मिळणार असून ४ कोटी निधी म्हणजेच ४० टक्के राज्य सरकार देणार आहे. त्याचबरोबर इतर खर्च म्हणून ३२ कोटी ९७ लाख रूपये खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

तसेच जळगांव, लातूर, बारामती व सांगली (मिरज) येथे होणाऱ्या परिचर्या महाविद्यालयांसाठी इतर खर्च म्हणून अंदाजे १०७ कोटी ९४ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT