Veterinary Medicine College : राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार, विधेयक मंजूर

State Government : राज्य सरकारकडून काल विधेयक मांडण्यात आले. यावर एकमताने राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
radhakrishna vikhe patil
radhakrishna vikhe patilagrowon
Published on
Updated on

Maharashtra News : राज्यात सध्या सहा पशु वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या कमी आहे. पशुधनाची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही संख्या अत्यल्प आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काल विधेयक मांडण्यात आले. यावर एकमताने राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेले विधेयक विधान परिषदेत बुधवारी एकमताने मंजूर झाले.

radhakrishna vikhe patil
Almatti Koyna Dam Level : कोल्हापूर, सांगलीला महापुराचा फटका बसणार का ? कोयना, चांदोली आणि अलमट्टी धरणांच्या पाणीपातळीत वाढ

मागील काही वर्षांत विविध साथी आणि आजारांमुळे राज्यातील पशुधन घटले आहे. मनुष्यबळाअभावी उपचार न झाल्यास भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तसेच खासगी क्षेत्रातील पशुवैद्यकीय पदवीधरांची वाढती मागणी लक्षात घेता खाजगी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com