Girls Education : मुलींसाठी नर्सिंग, पॅरामेडिकल, फार्मसीतील करिअर

शुल्क सवलती, शिष्यवृत्ती मिळाल्यास शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थिनींही नक्कीच करू शकतात.
Girls Education
Girls EducationAgrowon

प्रा. विजय नवले

नर्सिंग

अ) बी. एस्सी (नर्सिंग) (Nursing) हा चार वर्षांचा पदवी कोर्स आहे. त्यासाठी बारावी सायन्स (पीसीबी ग्रूप ) ही शैक्षणिक अर्हता आहे. त्यामध्ये किमान ४५ टक्के गुण आणि ‘नीट’ ची परीक्षा अनिवार्य आहे.

ब) एएनएम (नर्सिंग) (ANM) हा बारावी सायन्स नंतर दोन वर्षांचा, जीएनएम (नर्सिंग) हा बारावी सायन्स नंतर तीन वर्षांचा कोर्स आहे. या दोन्ही कोर्ससाठी ‘नीट’ परीक्षेची गरज नाही.

क) या सोबत सहा महिने, एक वर्षांचे कमी शुल्काचे प्रमाणपत्र कोर्सेसही अनेक खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असतात. त्यांचेही शुल्क वेगवेगळे असून, त्वरीत कामाची संधी असल्यामुळे त्याकडे मुलींचा ओढा असतो.

सोबतच शुल्क सवलती, शिष्यवृत्ती मिळाल्यास शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थिनींही नक्कीच करू शकतात.

संधी : शासकीय-खाजगी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, वृद्धाश्रम, केअर सेंटर्स, छोटी मोठी खासगी क्लिनिक्स, शासकीय आरोग्य उपक्रम, दवाखाने, अनाथालये, घरगुती सेवा अशा ठिकाणी नर्सिंगनंतर नोकरीच्या संधी आहेत.

Girls Education
Agriculture Education : कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

आवश्यकता व गुण

सेवावृत्ती, रुग्णांबद्दल आस्था, आनंदाने सुश्रुषा करण्याची वृत्ती, सुस्वभाव, शिस्तबद्ध काम, सेवेतील अचूकता, आरोग्यवर्धक सवयी, निरीक्षण, तत्परता आदी गुणकौशल्ये असलेल्या व्यक्तीला हे काम सहजपणे जमू शकते.

आजारी-रोगी-अत्यवस्थ पेशंट, रक्त, भीतीदायक प्रसंग, वेदना, जखमा अशा गोष्टींना न घाबरता व लक्ष विचलित होऊ न होता काम करणे शक्य असल्यास हे करियर अत्यंत समाधान देणारे आहे.

अन्य पॅरामेडिकल कोर्सेस

- रेडिओलॉजी हा सध्या चर्चेतील कोर्स आहे. बी. एस्सी (रेडिओलॉजी) हा तीन वर्षांचा पदवी कोर्स आहे.

- बारावीनंतर तीन किंवा चार वर्षांचे वेगवेगळे पदवी कोर्सेस फिजिओथेरपी मध्ये आहेत.

- पॅरामेडिकल क्षेत्राशी संबंधित दोन किंवा तीन वर्षांच्या अनेक पदविका उपलब्ध आहेत. त्यासाठी नीट परीक्षेची आवश्यकता नाही. काही कोर्सेस यापेक्षा कमी कालावधीचे, कमी शुल्काचे आहे. त्यातून नोकरीच्या संधी उपल्बध होऊ शकतात.

उदा. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, डायलिसिस असिस्टंट, पॅथॉलॉजी डिप्लोमा, डीएमएलटी, लॅब असिस्टंट, एक्स रे सहाय्यक इ. - ‘डिप्लोमा इन रूरल हेल्थ केअर’ हा एकच वर्षाचा कोर्स आहे.

- त्याचबरोबर अपंग, लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांचे आरोग्य आणि काळजी याविषयीचे प्रमाणपत्र कोर्सेस आहेत. त्याचबरोबर स्थूलता, आहार शास्त्र, योग, निसर्गोपचार या विषयीचे देखील डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस कमी कालावधीचे व शुल्कामध्ये करता येतात.

Girls Education
Education : वीटभट्टीवरील मुले शिक्षणाच्या प्रवाहात

फार्मसी कोर्सेस

बारावी सायन्स नंतर बी. फार्मसी हा चार वर्षांचा कोर्स असून, त्यासाठी ‘एमएचटी सीईटी’ ही परीक्षा अनिवार्य आहे. बारावी नंतर ‘डी फार्मसी’ हा दोन वर्षांचा कोर्स आहे. त्याला प्रवेश परीक्षा गरजेची नाही.

‘केमिस्ट्री’ हा विषय आवडीचा असेल तर हे क्षेत्र उत्तम आहे. या शिक्षणानंतर औषध निर्माण कंपन्यामध्ये औषध उत्पादन, गुणवत्ता, संशोधन, मार्केटिंग या विभागांमध्ये नोकरी उपलब्ध आहेत. तसेच शासकीय पातळीवर ‘ड्रग इन्स्पेक्टर’, शासकीय इस्पितळांत ‘फार्मासिस्ट’ सारखी पदे असतात.

थोडे भांडवल गुंतवणे शक्य असल्यास स्वतः चे ‘मेडिकल स्टोअर’ ही उघडता येते. पदव्युत्तर शिक्षणानंतर अध्यापन /शिक्षण क्षेत्रात काम करता येऊ शकेल. या पदवी कोर्ससाठी समाज कल्याण विभागाच्या व अन्य शिष्यवृत्ती योजना व शुल्क सवलती उपलब्ध आहेत.

त्यामुळे शुल्क अधिक असले तरी ग्रामीण मुलामुलींना फार्मसी करणे फारसे अवघड ठरणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com