Agricultural College in Parli Beed : परळीच्या मौजे जिरेवाडीत साकारणार कृषी महाविद्यालय

Agricultural College : राज्यातील विद्यार्थ्यांना शेती विषयक चांगले शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाकडून नव्या कृषि महाविद्यालयाची निर्मिती केली जात आहे. याचतंर्गत बीडमधी नव्या कृषि महाविद्यालयास मंत्रिमंडाने मान्यता दिली आहे.
Agricultural College  in Parli Beed
Agricultural College in Parli BeedAgrowon

Beed News : राज्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. ही शेती कुठे पारंपारीक तर कुठे आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर केली जाते. यावेळी कृषी महाविद्यालय आणि कृषि विद्यापीठांकडून नव नवे प्रयोग केले जातात. यातून प्रयोगशील शेतकरी घडवले जातात. असाच प्रयत्न बीड जिल्ह्यातील परळी तालूक्यातील मौजे जिरेवाडीत केला जात आहे. येथे मागणी होत असलेल्या कृषि महाविद्यालयास मंत्रिमंडाने गुरूवार (२८ रोजी) मान्यता दिली आहे. त्यामुळे मौजे जिरेवाडी येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय कृषि महाविद्यालय आणि शासकीय कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालूक्यातील मौजे जिरेवाडी येथे शासकीय कृषि महाविद्यालय व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर शासकीय कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या मागणीने जोर धरला होता. त्याप्रमाणे गुरूवार (२८ रोजी) पार पडलेल्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजूरा देण्यात आली आहे.

Agricultural College  in Parli Beed
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी दिली कृषि प्रदर्शनाला भेट

मौजे जिरेवाडी येथील प्रास्ताविक महाविद्याय व्हावे यासाठी वसंतराव नाईक माराठावाडा कृषि विद्यापीठाने शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी विद्यापीठाने १६,५३७.६७ लाख इतका खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते.

तसेच दोन्ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय इमारती, विद्यार्थी-विद्यार्थीनी वसतीगृहे, अधिकारी/कर्मचारी निवासी इमारती, व्यायामशाळा, सभागृहे, सुविधा केंद्र, इतर कामांसह ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी अंदाजे खर्च रू १६,५३७.६७ लाख सांगितला होता.

Agricultural College  in Parli Beed
Ravikant Tupkar : ...अन् रविकांत तुपकरांनी जिल्हा कृषि अधीक्षकांच्या दालनात मांडला ठिय्या

शासनास सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने छाननी करून शासकीय कृषि महाविद्यालयासाठी रू. ७८६५.२६ लाख व कृषि व्यवस्थापन महाविद्यालयासाठी रू ५४४१.४३ लाख अशी एकूण रू १३३०६.६९ लाख रक्कमेस मान्यता दिली आहे.

याबाबत राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने मंजूरी दिली आहे. तसेच याचा शासन निर्णय क्रमांक- मकृवि-१३२३/प्र.क्र.२५३/७-अे असा आहे. तसेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com