Bribe  Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe Arrest News : सरपंच मुलगीसह वडिलांना ५० हजारांची लाच घेताना अटक

Anti-corruption Department : कोला जिल्ह्यातील टाकळी खुर्द येथील सरपंच व तिच्या वडिलांविरुद्ध ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील टाकळी खुर्द येथील सरपंच व तिच्या वडिलांविरुद्ध ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली पोलिस कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ६) अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने म्हटले आहे, की त्यांचे गॅरेज वडिलांनी खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटवर स्थलांतरित करायचे होते. त्यामुळे त्यांनी २७ जुलैला हा प्लॉट अकृषिक करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे सर्व कागदपत्रांसह लेखी अर्ज दिला होता.

मात्र सरपंच प्रज्ञा दामोदर यांनी वेळोवेळी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली. ३१ ऑगस्टला तक्रारदार हे सरपंच प्रज्ञा दामोदरला भेटले असता, त्यांनी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

या प्रकारच्या तक्रारीवरून शुक्रवारी दोन शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. प्रज्ञा दामोदर यांनी तडजोडीअंती ४० हजार रुपयांची मागणी करून अॅडव्हॉन्स म्हणून आणून द्या असे म्हटले. याची खातरजमा केल्यानंतर ग्राम टाकळी खुर्द येथे शासकीय पंचासमक्ष सापळा लावण्यात आला असता सरपंच प्रज्ञाचे वडील जगजीवन लहुजी दामोदर यांनी प्रज्ञा दामोदर हिच्या सांगण्यावरून १० हजार रुपये तक्रारदारांकडून स्वीकारले. या वेळी लपून बसलेल्या पोलिसांनी दामोदर यांना अटक केली.

दहीहांडा (ता. अकोट, जि. अकोला) पोलिस ठाण्यात सरपंच व तिच्या वडलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सच्चिदानंद शिंदे आणि अपर पोलिस अधीक्षक अनिल पवार व पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, सचिन सावंत, पोलिस अंमलदार डिगांबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, विलेश शेगोकार, संदीप ढाले, प्रिया सुरुवाडे, अर्चना घोडेस्वार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT