Agmark Bribe News : ‘एगमार्क’च्या अधिकाऱ्याला लाखाची लाच घेताना अटक

Corruption Investigation : नाशिक रोड परिसरामध्ये केंद्र सरकारच्या कृषी व विपणन विभागाच्या ‘एगमार्क’ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास एक लाखाची लाच घेताना सोमवारी (ता. २) दुपारी अटक करण्यात आली.
Agmark Bribe News
Agmark Bribe News Agrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक रोड परिसरामध्ये केंद्र सरकारच्या कृषी व विपणन विभागाच्या ‘एगमार्क’ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास एक लाखाची लाच घेताना सोमवारी (ता. २) दुपारी अटक करण्यात आली. मुंबई सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.

Agmark Bribe News
Bribe Arrest : तलाठ्याला वीस हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत कृषी उत्पादकांना परवाना देणारे विपणन व तपासणी संचालनालय (एगमार्क) कार्यालय नाशिक रोड परिसरातील आनंदनगरमध्ये आहे. धुळे येथील डेअरी प्रॉडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीने परवाना घेण्यासाठी या कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता येथील लाचखोर विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकर याने एक लाखाची लाच मागितली होती.

Agmark Bribe News
Bribe Arrest : भूकरमापकासह एक खासगी व्यक्ती लाच घेताना ताब्यात

या संदर्भात डेअरी कंपनीने मुंबई सीबीआयकडे केली होती. याची शहानिशा केल्यानंतर सोमवारी (ता. २) सीबीआय एसीबी मुंबईचे डीआयजी डॉ. सदानंद दाते यांच्या नेतृत्वात ३० अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार नाशिक रोड येथील एगमार्क कार्यालयात लाचखोर विशाल तळवडकर यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

‘सीबीआय’ने या प्रकरणी कार्यालयातील आणखी काही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करीत कारवाई सुरू केली आहे. तळवडकर यांनी सहकारी कर्मचाऱ्यासाठी ही लाच स्वीकारल्याचे प्रथम चौकशीतून समोर आले आहे. ‘सीबीआय’च्या या कारवाईने केंद्रीय कृषी विभागात खळबळ उडाली आहे. लाचखोरास मंगळवारी (ता. ३) नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. मोठ्या रकमेचे लाच प्रकरण असल्यामुळे या बाबत लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com