Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Constituency : सातारा लोकसभा मतदार संघात तिढा कायम

Satara Election Update : महायुतीकडून सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या खासदार उदयनराजे भोसले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

Team Agrowon

Satara News : राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर प्रचार सुरू झाला असला तरी सातारा लोकसभा मतदार संघात शांतता आहे. महायुतीकडून सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या खासदार उदयनराजे भोसले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संभाव्य यादी सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील किंवा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील असे दोन पर्याय ठेवले आहेत.

त्यामुळे सातारा मतदार संघात महायुतीकडून उदयनराजे भोसले किंवा नितीन पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील किंवा बाळासाहेब पाटील अशीच लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. महायुतीत अजितदादांची राष्ट्रवादी व भाजपचे उदयनराजे यांच्यात एकमत होत नाही. यातूनच उमेदवारी मिळविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

त्यामुळे महायुतीत अस्वस्थता वाढली आहे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये साताऱ्यासाठी कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील किंवा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

महायुतीने जर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांनाच रिंगणात उतरविले जाण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सोडल्यास त्यांच्याकडून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील यांचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

मात्र अजूनही सातारा लोकसभेसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी नावे निश्चित जाहीर झाली नसल्याने मतदार संघात तर्कवितर्क लावले जात आहे. पुढील दोन दिवसात उमेदवार निश्चित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र महायुतीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: जानेफळ येथे शेतकरी कंपनीच्या केंद्रावर सोयाबीन खरेदीला सुरुवात

Leopard Attack: वडिलांच्या प्रसंगावधानाने बिबट्याच्या हल्ल्यातून मुलाची सुटका

Agriculture Field Visit: ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ उपक्रमाअंतर्गंत प्रक्षेत्रभेटी

Agriculture Loan: ‘ॲग्रिकल्चर इज बेस्ट कल्चर’ शिबिराद्वारे एकूण २६ कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर

OTP Verification: ओटीपी प्रमाणीकरण मान्य करा

SCROLL FOR NEXT