Loksabha Election 2024 : यशवंत सेना लढवणार लोकसभेच्या १५ जागा

Yashwant Sena : सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याऐवजी डावलले जात आहे.
Loksabha
LoksabhaAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत.

आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याऐवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील १५ लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.

नगर येथे रविवारी (ता. २४) यशवंत सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नांवर राज्यभर लढा देणाऱ्या आणि समाजात अधिक प्रभाव असलेल्या यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी ‘ॲग्रोवन’ शी संवाद साधत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पाश्वभूमीवर माहिती दिली.

बाळासाहेब दोडतले म्हणाले, ‘‘धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी आम्ही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पहिल्यांदा २१ दिवस उपोषण केले. आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेतले. सरकारने दिलेली मुदत संपल्यावर पुन्हा उपोषण केले. मात्र आरक्षण देण्याबाबत दोन वेळा सरकारकडून शब्द देऊनही शेवटी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.’’

Loksabha
Loksabha Election : आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १७ निर्णय

एक तर सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. आरक्षण दिले नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ मतदार संघात कोणत्याही पक्षाने धनगर समजाला प्रतिनिधित्व अजून दिलेले नाही. आता देतील याचीही शाश्वती दिसत नाही. राज्यातील दोन्ही राजघराण्यातील व्यक्तीला संधी दिली जात असताना धनगर समाजही राजी होता.

तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात प्रभाव असतानाही धनगर समाजाला जाणीवपूर्वक डावलले जात असल्‍याचे स्पष्‍ट झाले असल्याने आता धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या नगर, शिर्डी, नाशिक, माढा, सोलापूर, सांगली, बारामती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, यवतमाळ, सातारा, व जालना या पंधरा मतदार संघात धनगरसेना आपले उमेदवार उभे करणार आहे.

Loksabha
Shirur Loksabha Election : ही लढाई सगळ्या निवडणुकांचे विक्रम तोडेल ः आढळराव पाटील

दोडतले यांच्या या भूमिकेने राज्यात अनेक राजकीय पक्षांची मोठी अडचण होणार आहे. माणिक दांगडे पाटील, अण्णासाहेब रूपनवर, दादासाहेब केसकर, गोविंद नरवटे, नितीन धायगुडे, गंगाधर कोळेकर, लक्ष्मण कोकरे, दत्ता काळे, गुजर, बाळासाहेब कोरके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘राम शिंदे ना उमेदवारी हवी होती’

बाळासाहेब दोडतले म्हणाले, ‘‘राम शिंदे हे माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या कामांमुळे नगर जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे. ते जिंकणारे उमेदवार असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपने उमेदवार द्यावी, अशी मागणी आहे. मात्र त्याबाबत गांभिर्याने विचार केला नाही. त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com