Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Farmer Issue : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून हा पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

Team Agrowon

Latur and Dharashiv News : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून हा पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. पावसामुळे सोयाबीनचे पीक पाण्याखालीच असून त्याची काढणीही शेतकऱ्यांना करता येत नसल्याची स्थिती आहे.

दरम्यान पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामेही रखडले असून आचारसंहितेपूर्वी भरपाई मंजूर करून घेण्यासाठी प्रशासनाची घालमेल सुरू झाली आहे. शनिवारी (ता. ५) पहाटेही जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मदनसुरी (ता. निलंगा) भागात पहाटे झालेल्या पावसामुळे पुन्हा पिके पाण्याखाली घेली व ओढ्याला पूर आल्याने मदनसुरी ते किल्लारी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.

दोन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू झाले. सर्वदूर पाऊस न होता काही भागातच पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे. यामुळे यंदा चांगले आलेले सोयाबीनचे पीक वाया गेले असून ऐन काढणीच्या वेळी पाऊस येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यात चिखल व पाण्यातील सोयाबीन काढण्यासाठी मजुरांकडून अडवणूक केली जात असून, जादा मजुरीची मागणी केली जात आहे.

अन्य राज्यांतील काढणीयंत्र जिल्ह्यात दाखल झाले असून, गवताचे जास्त प्रमाण असलेले तसेच पाणी व चिखल असलेले सोयाबीन काढण्यासाठी यंत्रचालक नकार देत आहेत. शुक्रवारी (ता. चार) दुपारी तांदुळजा (ता. लातूर) व औराद शहाजानी (ता. निलंगा) परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोयाबीनची पुरती वाट लागली असून तूर पीकही पिवळे पडत आहे. लातूर व परिसरातही हा पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात उमरगा व कुऱ्हाळी परिसरात मोठा पाऊस झाला. उमरग्यातील महावितरण कार्यालयात पावसाचे पाणी शिरले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT