Ujani Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : ‘उजनी’तून भीमेत विसर्ग वाढवला

Ujani Water Storage : सोमवारी (ता. २६) उजनी धरणातून जवळपास ७१ हजार ६०० क्युसेक इतके पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात पाऊस सुरू असल्याने या भागातील धरणातील पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत असून, उजनी धरण आधीच शंभर टक्के भरल्याने पूरनियंत्रणासाठी आता उजनीतून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

सोमवारी (ता. २६) उजनी धरणातून जवळपास ७१ हजार ६०० क्युसेक इतके पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील पावसावरच मागच्या महिन्यात उजनी धरणाने शंभर टक्क्यांची पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूरनियंत्रणासाठी धरणातून सातत्याने नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

पण आता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात पावसाने सुरुवात केल्याने उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. दौंडकडून उजनीमध्ये ८२ हजार ५१९ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. तर पुढे उजनीतून भीमा नदीत ७१ हजार ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याशिवाय वीर धरणही शंभर टक्के भरले आहे. तिकडूनही नीरा नदीत जवळपास २३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

भीमा आणि नीरा या दोन्ही नद्यांचे पाणी पंढरपुरात भीमा नदीत एकत्रित मिसळत असल्याने पंढरपूरसह नदीकाठच्या शंभर गावांना पूरस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे.

परिणामी, गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा पंढरपुरातील जुना दगडी पूल आणि चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात गेली आहेत. तसेच नदीकाठच्या काही गावातही पाणी शिरू शकते, या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

उजनीत ५५.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ होत असल्याने उजनी धरणाची पाणीपातळी वाढत आहे. सोमवारी (ता.२६) दुपारी उजनी धरणाची एकूण पाणीपातळी ४९७.००० मीटरवर पोचली, तर पाण्याचा एकूण साठा ११९.२६ टीएमसी एवढा राहिला. त्यात उपयुक्त साठा ५५.६० टीएमसी आणि या पाण्याची टक्केवारी १०३.७९ टक्के एवढी राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT