Pune Zilla Parishad Recruitment  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Zilla Parishad Recruitment : पुणे जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया रखडली

Pune Zilla Parishad : परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अर्ज भरून चार महिने लोटले आहेत, पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार, अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.


ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षा जूननंतरच होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल ४ जूनला जाहीर होतील. त्यानंतरच या प्रक्रियेला वेग येईल. मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु परीक्षा कधी होणार आहे, याविषयी उमेदवार प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणारे उमेदवार हवालदील झाले आहेत.


‘परीक्षा लवकर घ्यावी’
ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. ही परीक्षा लवकर घ्यावी. उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Food Stock: अमेरिकेत शीतगृहांतील अन्नसाठा नीचांकी पातळीवर

Dairy Sector Protection: शेतीसह डेअरी व्यवसायाला संरक्षण

Sugar Quota : मे महिन्यासाठी साखर २२.५ लाख टन कोटा

Orange Heatwave Crisis: संत्र्याची होरपळ

Vidarbha Weather Update: होरपळणाऱ्या विदर्भाला मिळणार ‘थंडावा’

SCROLL FOR NEXT