Shirur Loksabha Election : ही लढाई सगळ्या निवडणुकांचे विक्रम तोडेल ः आढळराव पाटील

Shivajirao Adhalrao Patil : शिवसेनेचे तीन वेळा खासदार राहिलेले शिंदे गटाचे उपनेते आणि शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा महायुतीच्या समन्वयातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील प्रवेश निश्‍चित झाला आहे
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilAgrowon

Pune News : शिवसेनेचे तीन वेळा खासदार राहिलेले शिंदे गटाचे उपनेते आणि शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा महायुतीच्या समन्वयातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील प्रवेश निश्‍चित झाला आहे.

२६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी (ता.२३) माध्यमांसोबत बोलताना सांगितले. तर माझी लढाई सगळ्या निवडणुकांचे विक्रम तोडेल असा आत्मविश्‍वास आढळराव यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला.

Shivajirao Adhalrao Patil
Loksabha Election : आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १७ निर्णय

दरम्यान, आढळराव पाटील यांची शनिवारी (ता. २३) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. बैठकीनंतर आढळराव पाटील आणि तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या वेळी आढळराव म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी (ता.२६) पक्षात प्रवेश करणार आहे. मी पक्षप्रवेश करतोय, त्यामुळे माझी उमेदवारी निश्चित आहे. २०१९ च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मी उभा राहणार आहे.

माझ्या जनतेला विजयाची १०० टक्के खात्री आहे. काही नसताना पहिली निवडणूक ३० हजार मतांनी जिंकलो होतो. दुसरी लोकसभा निवडणूक १ लाख ८० हजारांच्या मताधिक्क्याने, तर तिसरी निवडणूक ३ लाख ३ हजारांनी जिंकलो होतो. आत्ताची माझी लढाई सगळ्या निवडणुकांचे विक्रम तोडेल,’’ असा आत्मविश्‍वास व्यक्त केला.

Shivajirao Adhalrao Patil
Loksabha Election : सांगली, हातकणंगले लोकसभेसाठी यंत्रणा सज्ज

मुख्यमंत्र्यांची मान्यता

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, तसेच मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झालेले आहे. या दोघांनी पण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाला क्लीन चीट दिली आहे, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

कोणी कोणाला पळवलेल नाही, मी महायुतीचा उमेदवार महायुतीतील सर्व घटकपक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवायचं आहे. अबकी ४०० पार ही संकल्पना केंद्र पातळीवर राबवण्यासाठी आणि राज्यात मिशन ४५, मिशन ४८ पार करण्यासाठी आम्ही सगळे मतभेद विसरुन एक दिलाने कामं करणार आणि महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणणार. ही महायुती आहे.. तिन्ही पक्षांनी ठरवलंय, त्यामुळे कोणी कोणाला पळवलं असं नाही, तर हा महायुतीचा उमेदवार आहे.‘‘
-शिवाजीराव आढळराव पाटील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com