Sugarcane FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : मांजरा परिवाराची पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर

FRP News : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांकडून यावर्षी उसाला पहिली उचल अडीच हजार रुपये हा दर निश्चित केला आहे.

Team Agrowon

Latur News : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांकडून यावर्षी उसाला पहिली उचल अडीच हजार रुपये हा दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे गाळपही नियोजनबद्ध सुरू असल्याची माहिती तोंडार (ता. उदगीर) येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोनचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी दिली.

उदगीर तालुक्यातील उसाचे गाळप मांजरा परिवारातील विलास युनिट क्रमांक दोन व तळेगाव (ता. देवणी) येथील जागृती शुगर या दोन साखर कारखान्यांमध्ये प्रामुख्याने केले जाते. यावर्षी एक महिन्यापूर्वी गाळपाला सुरुवात झाली आहे. अद्याप दर निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना पहिली उचल दिली गेली नाही. मात्र आता मांजरा परिवाराने पहिली उचल दर जाहीर केलेली शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावर्षी पहिल्या वर्षीचा व खोडवा या दोन्ही प्रकारच्या उसाचे सरासरी उत्पादन कमी येत आहे. सातत्याने पडलेला पावसाचा खंड आणि यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती त्यामुळे पाण्याची कमतरता आणि वातावरण पोषक नसल्याने उसाचे पीक उतारा नसल्याची स्थिती आहे. अगदी ५० टक्क्यांवर उतारा येत असल्याने यावर्षी कारखान्यांकडून प्रतिटन जास्तीची पहिली उचल रक्कम मिळावी अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र गेल्या वर्षीच्या केवळ ३०० रुपये दरवाढीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने साडेतीन ते चार हजार रुपयाची पहिली उचल देत आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांचे संघटन आणि शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या शेतकरी संघटना या भक्कम असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

मात्र उदगीर तालुक्यामध्ये शेतकरी संघटित नसल्याने व शेतकऱी संघटना फक्त निवेदनापुरत्या असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोणीही दिसून येत नाही. त्यामुळे या भागातील भक्कम प्रमाणात चालणारे साखर कारखाने सर्वप्रथम कारखान्याचे हित पाहूनच काम करताना गेल्या अनेक वर्षापासून दिसून येत आहेत.

विलास युनिट क्रमांक दोन या साखर कारखान्याचे नियोजनबद्ध गाळप सुरू आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने यावर्षी जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे या वेळी कार्यकारी संचालक पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT