Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या

Rain Update : जून महिना संपत आला तरी अजूनही पुरेसा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. २६ दिवसांत केवळ ७३.२० मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली.

Team Agrowon

Chandrapur News : जून महिना संपत आला तरी अजूनही पुरेसा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. २६ दिवसांत केवळ ७३.२० मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.आतापर्यंत २४ टक्केच पेरण्या आटोपल्या. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ४ लाख ५८ हजार ७२९ हेक्टर इतके आहे. त्यापैकी एक लाख १० हजार ८५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ५८ हजार ७२९ हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मूल ते ब्रह्मपुरीपर्यंतचा भाग धानपट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो. धानाचे एकूण क्षेत्र एक लाख ८५ हजार हेक्टर आहे. धानाला जास्त पावसाची आवश्यकता भासते.मात्र अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही.

त्यामुळे धानपट्ट्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. धानाचे पऱ्हे ४ हजार ३१९, तर पेरीव ७ हजार ३६८ हेक्टरवर झाले आहे. धानापाठोपाठ जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तुरीचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. कापसाचे क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर आहे. कापसाला पाऊस कमी लागतो.

जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात थोडाबहुत पाऊस झाला होता. याच पावसाने अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या पेरणी केल्या. सध्या ७५ हजार ३३३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या. सोयाबीनचे क्षेत्र ७० हजार आणि तुरीचे पीक ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते.सोयाबीनला पाऊस कमी लागतो.

त्यामुळे जिल्ह्यात १९ हजार ६५१ हजार हेक्टर क्षेत्रावर सध्या सोयाबीनची पेरणी झाली. तुरीची ७ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी आणि अन्य भागात थोडाबहुत पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुबारपेरणी करावी लागली. चंद्रपूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४२ मिमी आहे. २६ जूनपर्यंत केवळ ७३.२० मिमी पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT