Kharif Sowing : बुलडाणा जिल्ह्यात ५० टक्के खरीप पेरणी आटोपली

Sowing Update : जिल्ह्यात सोयाबीनची लागवड सुमारे दोन लाख हेक्टरपर्यंत पोचली असून मक्याची लागवडही सरासरीच्या ७५ टक्क्यांवर पूर्ण झाली. कपाशीच्या पेरणीलासुद्धा वेग आलेला आहे.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यात आजवर झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभही केला आहे. जिल्ह्यात सोयाबीनची लागवड सुमारे दोन लाख हेक्टरपर्यंत पोचली असून मक्याची लागवडही सरासरीच्या ७५ टक्क्यांवर पूर्ण झाली. कपाशीच्या पेरणीलासुद्धा वेग आलेला आहे.

या जिल्ह्याचे अर्थकारण खरीप हंगामावरच सर्वाधिक अवलंबून आहे. खरीप साधला तर वर्षभराचे अर्थकारण ठिकठाक राहते. यंदा जिल्ह्यात ७ लाख ३५,५२१ या सरासरी क्षेत्रावर लागवडीचे नियोजन झालेले आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन लाख ७२ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ५०.६२ टक्के ही पेरणी पूर्ण झाली आहे.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : बीडमध्ये ७८ टक्के पेरणी आटोपली

सोयाबीन, कपाशी, मका अग्रेसर

जिल्ह्यात खरिपात सोयाबीन, कपाशीसह मका, तूर ही मुख्य पिके झालेली आहेत. त्यातही सोयाबीन या पिकाभोवतीच अर्थकारण फिरत असते. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९६ हजार ४२५ हेक्टर एवढे आहे. यापैकी एक लाख ९५ हजार ३९९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आटोपली. पाऊस जसजसा होत आहे, तशी पेरणी केली जात आहे. उगवण झालेल्या पिकात काही ठिकाणी आंतरमशागतीच्या कामांनीही वेग धरलेला आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर कपाशीची ७६ हजार ६२९ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. प्रामुख्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. कोरडवाहू पट्ट्यातही काही क्षेत्र कपाशीच्या लागवडीखाली आले असून पेरणी सुरूच आहे. यंदा तुरीची लागवड करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल टिकून आहे. इतर सर्वच पिकांच्या तुलनेत तूर सातत्याने १० हजारांवर विकते आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून सर्वच शेतकरी तुरीच्या लागवडीला पसंती देत आहेत. यावर्षी आतापर्यंत सरासरी ७९२०८ हेक्टरच्या तुलनेत ३१२०७ हेक्टरवर तुरीची पेरणी आटोपलेली आहे.

विदर्भात मका लागवडीत बुलडाणा अग्रेसर

खरीप हंगामात विदर्भात मक्याचे सरासरी सर्वाधिक २०,८३५ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी आतापर्यंत १५,४९९ हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा फटका मका लागवडीला बसत होता. शेतकरी पर्यायी पिकांकडे झुकू लागले होते. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने शेतकरी पुन्हा मक्याच्या लागवडीला पसंती देत आहेत.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : परभणीत २५.५९ टक्के, तर हिंगोलीत ३२.३० टक्के पेरणी

बुलडाणा, चिखली, मोताळा, नांदुरा, खामगाव, मेहकर आदी तालुक्यात मक्याची लागवड करण्यास शेतकरी अधिक प्रमाणात पसंती देतात. दुसरीकडे खरीप ज्वारी सरासरी क्षेत्राएवढीही लागवड होत नसल्याचे दिसून आले. १०,१९७ हेक्टरपैकी केवळ ६२ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मूग, उडदाच्या बाबतीतही असेच घडत आहे. अनियमित पाऊस, कीडरोगांच्या प्रादुर्भावाचा फटका मूग, उडदाला बसतो आहे. या दोन्ही पिकांचे सरासरी क्षेत्र अनुक्रमे २० व २२ हजार हेक्टरवर आहे. तुलनेत आतापर्यंत दोन्ही पिकांची प्रत्येकी २,७०० व २,५०० हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली.

पीकनिहाय झालेली लागवड व क्षेत्र

पीक लागवड (हेक्टर)

मका १५,४९९

तूर ३१,२०७

मूग २,६३९

उडीद २,४७८

सोयाबीन १,९५,३९९

कपाशी ७६,६२९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com