Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : पावसाचा जोर ओसरला

Weather Update : कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी बरसल्या. तर मंगळवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत दावडी घाटमाथ्यावर १०८ मिलिमीटर पाऊस झाला.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी बरसल्या. तर मंगळवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत दावडी घाटमाथ्यावर १०८ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र गेल्या काही दिवसांतील सततच्या पावसामुळे धरणांत अजूनही आवक वेगाने सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून विसर्ग सुरूच आहे.

सध्या घाटमाथ्यावर काही प्रमाणात जोर मंदावला असला, तरी शिरगाव घाटमाथ्यावर ८६, भिरा ८४, ताम्हिणी ८०, कोयना ७८, लोणावळा येथे ६५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस पडला.

ठाण्यातील दहिसर, बेलापूर मंडलांत २० मिलिमीटर, तर सिंधुदुर्गमधील कणकवली, फोंडा, सांगवे ३३, पालघरमधील जव्हार, साखर २३, खोडला, झरी येथे २२, तर रायगडमधील माणगाव ३०, गोरेगाव, लोणेरे २८, रत्नागिरीतील खेर्डी, धामणंद ४१, कळकवणे ३८, शिरगाव ३५, आंबवली, कुळवंडी येथे ३० मिलिमीटर पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात काही प्रमाणात पाऊस पडत आहे. यामध्ये साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक ७० तर तापोळा २१, नाशिकमधील धारगावात २५, हरसूल, थानापाडा २३, पुणे जिल्ह्यातील माले, मुठे ३०, कार्ला ५२, वेल्हा, पानशेत २१, सोलापुरातील शेळगी ३७, बोरामणी २१, मुस्ती २९, तर कोल्हापुरातील कडगाव येथे ३२ मिलिमीटर पाऊस झाला. नगरमधील अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागात मध्यम पाऊस झाला. नाशिकमधील धरणांत अजूनही आवक सुरू आहे. उजनी धरणातून भीमा नदीत अजूनही विसर्ग सुरू आहे.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. विदर्भातील यवतमाळमधील बाभूळगाव मंडलात १८, पाहूर १३, सावर १६, चंद्रपुरातील गोंडपिंपरी, धाबा ११, नावरगाव २३, शिंदेवाही, मोहाली २९, गडचिरोलीतील येवळी ५०, धानोरा ४७, गडचिरोली ३५, मुरूमगाव ३१, करवाफा २१, तरडगाव ३४, भामरागड येथे ४६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे विदर्भातील धरणांत पाण्याचा येवा सुरूच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय; परिवहनची अतिरिक्त जमीन व्यापारी तत्वावर वापरास मंजुरी

Lumpy Skin : जाफराबादेत २१ जनावरांना ‘लम्पी’ची बाधा

Agriculture Solar Pump : पैसे भरूनही सौरपंप मिळेना

Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’तून गोदावरी पात्रात विसर्ग थांबविला

Krishi Seva Kendra : आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT