Lumpy Skin : जाफराबादेत २१ जनावरांना ‘लम्पी’ची बाधा

Lumpy Disease Outbreak : गोवंशीय जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या लम्पी स्कीन या विषाणूजन्य आजाराचा तालुक्यामध्ये प्रादुर्भाव झाला आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon
Published on
Updated on

Jalna News : गोवंशीय जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या लम्पी स्कीन या विषाणूजन्य आजाराचा तालुक्यामध्ये प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत २१ जनावरांना त्याची लागण झाली आहे. तालुक्यातील ३४ हजार ५०० गुरांपैकी २१ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.

यामध्ये टेंभुर्णी, वरुड या गावांसह नदीकाठच्या गावातील गुरांचा समावेश आहे. २१ गुरांपैकी जवळपास १५ गुरांना उपचारानंतर फरक पडला आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय दवाखाना टेंभुर्णी अंतर्गत असलेल्या २२ गावांपैकी दोन गावातील गुरांची स्थिती गंभीर असल्याचे कळते.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहिमेसाठी समिती नियुक्त

दरम्यान, जाफराबाद तालुक्यामध्ये गोवंशवर्गीय ३३ हजार ४३० जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. यामुळे या आजाराची जनावरे कमी प्रमाणात आढळून आली आहेत. प्रामुख्याने जनावरांमध्ये हा रोग डास, माशा व गोचीडामुळे होऊ शकतो.

शक्यतो पावसाळी वातावरणामध्ये गोठ्यात डासांचे प्रमाण वाढते. यामुळे डास चावून गुरांच्या अंगावर जखमा होतात. यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : औसा तालुक्यातील चार गावांत ‘लम्पी’

आठ ठिकाणी दवाखाने

गुरांच्या उपचारांसह लसीकरणासाठी जाफराबाद तालुक्यामध्ये टेंभुर्णी, खासगाव, सावरगाव म्हस्के, माहोरा, वरुड, भारज, सिपोरा, जानेफळ या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध आहेत.

लम्पी स्कीन या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांनी, सोडियम हायपोक्लोराइडची गोठ्यात फवारणी करावी. ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध नसल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे सोडियम हायपोक्लोराइड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. लम्पीची लागण झाल्यास, सर्वांत आधी आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवावे व उपचार करून घ्यावे.
- नितीन देवाने, पशुविकास अधिकारी (विस्तार), जाफराबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com