Watershed Management Agrowon
ॲग्रो विशेष

Watershed Management : पाणलोटातून उपलब्ध पाण्याची गुणवत्ताही महत्त्वाची

Team Agrowon

Water Conservation : मागील लेखांमधील जलशास्त्राचेनिर्देशांक क्रमांक चार, पाच व सहा याबाबत काही माहिती पाहिली. उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर शाश्‍वत करण्याच्या दृष्टिकोनातून हेनिर्देशांक उपयुक्त असून, मूल्यमापनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आलेली आहे. त्याविषयी अधिक चर्चाया लेखामध्ये करणार आहोत.

पाणलोट क्षेत्र विकसनानंतर विविध माध्यमांतून पाणी उपलब्ध होते. निर्देशांक क्रमांक चार मध्ये जलसाठ्यांचे सद्यःस्थिती उदा. गावातील तळी, विहिरी आणि झरेयांना उपलब्ध झालेले नोंदवले जाते.

हे पाणी शेती उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरते. त्याचे मोजमाप करताना पाणलोट विकास पथक/ पाणलोट समिती याशिवाय संनियंत्रण व मूल्यमापन या यंत्रणेने जलसाठ्यांचे एकूण वाढलेले क्षेत्रफळ व त्यामुळे वाढलेले शेतीखालील क्षेत्र यांची प्रत्यक्ष पाहणी व सुदूर संवेदन पद्धतींचा अवलंब करावा, असे सुचविले आहे.

हे काम सहा महिन्यांतून एकदा केले पाहिजे. त्याच बरोबर केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून प्रत्येक गावामध्ये पूर्वीपासून काही पाणलोट क्षेत्र उपचारांची पाहणी करण्याचेही सुचविले आहे.

कारण कालांतराने पुरेशा डागडुजी अभावी हे उपचार गाळाने भरून त्यांची क्षमता कमी होते. साठून राहिलेला गाळ काढून त्यात पुन्हा जलसाठा पुनर्जीवनाचे काम केले जाते. अशा डागडुजी केलेल्या उपचारांचे सर्वेक्षणही त्यात अंतर्भूत आहे.

हे काम करताना पाणलोट विकास पथक, पाणलोट समिती किंवा संनियंत्रण व मूल्यमापन यंत्रणांनी नवीन व पुनर्भरण केलेल्या उपचारांचे नकाशे रेखाटून, त्याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर नोंदवणे व त्यात जमा झालेल्या पाणीसाठ्याचे मोजमाप करणेही अभिप्रेत आहे. त्याद्वारे जलसंकल्पामध्येनिश्‍चित केलेले अपधाव अडविण्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेकिंवा नाही, याचा अंदाज येतो.

मार्गदर्शक सूचनांप्रमाणेयाबाबत जैव भौगोलिक प्रदेशानुसार पाच तेदहा टक्केवाढ अपेक्षित आहे. यासाठी मागील लेखातील तक्ता क्रमांक एक पाहावा. त्यासोबत या लेखात दिलेली नगर जिल्ह्यातील हिवरे ढोलका (ता. पारनेर) येथील पाणलोटाच्या उपचारांमुळे झालेले बदल दर्शविणारी छायाचित्रे पाहावीत.

अलीकडे उपग्रह प्रतिमेच्या साह्याने एखाद्या क्षेत्रामध्ये झालेल्या पाणलोट विकासाच्या उपचारांचे नकाशेव बदल तपासू शकतो. हे मोजमाप दर सहा महिन्यांनी करावे. देशामध्ये व राज्यांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांमध्ये काही जुने तलाव, छोटी -मोठी धरणे, तळी, शिवकालीन साठवण बंधारे इ. उपचारांमध्ये साठलेला गाळ उपसून, त्या उपचारांची पुनर्क्षमता तयाेली जाते.

यामुळे गावांमधील पूर्वीच्या जल व्यवस्था कार्यान्वित होऊन त्याचा फायदा संपूर्ण गावाला होतो. याबाबत पाणलोट विकास पथक व समिती यांनी जागरूक राहून दरमहा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत स्तरावर पुनर्स्थापित झालेल्या जलसाठ्याची नोंद ठेवावी, असे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

सरासरी यामध्ये पुन्हा जैव-भौगोलिक प्रदेशानुसार सरासरी पाच तेदहा टक्केवाढ अपेक्षित आहे. सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये सदर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली नकाशांच्या आधारे नमूद केल्याप्रमाणे प्रवाह वाहून आणणाऱ्या (stream order) एक व दोन क्रमांकाच्या नालींचे उपचार नकाशा देणे बंधनकारक होते.

या नकाश्यांवरती नाल्यांवरती प्रस्तावित केलेले उपचार सिमेंट बांध, मातीनाला बांध, डाळीचे बांध, बांधबंदिस्ती इ. दाखविणे अनिवार्य होते. त्यानुसार पाणलोट विकास पथक/ समिती किंवा संनियंत्रण किंवा मूल्यमापन यंत्रणेने दरमहा उपचारांची संख्या प्रत्यक्ष मोजावेत. त्यासोबत सुदूर संवेदन या तंत्राचा वापर करण्याच्या सूचना आहेत.

पाणलोट क्षेत्र व पाण्याची गुणवत्ता पाण्याचे गुणवत्ता टिकविण्याबाबत पाणलोट क्षेत्रे व पाण्याचे मूलस्थानी केलेले संरक्षण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पाण्याचे रासायनिक गुणधर्म योग्य पातळीत राहतात. याशिवाय अडविलेल्या अपधावेचा शेती उत्पादकता व पिण्याच्या पाण्यावर चांगला परिणाम दिसून येतो. याबाबत आम्ही (प्रस्तुत लेखक) कृष्णा नदीच्या उपपाणलोट क्षेत्रामध्ये, क्षेत्र क्रमांक २२, क्रमांक २५, क्रमांक ३४ व भीमा नदी उपपाणलोट क्षेत्र क्रमांक ११४ या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास केला आहे.

२०१० मध्ये केलेल्या या अभ्यासादरम्यान मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनपश्‍चात ४८ विहिरींमधील पाण्याचे संकलन आणि रासायनिक पृथक्करण केले होते. एकूण ९६ पाण्याच्या नमुन्यांचे रासायनिक पृथक्करण केल्यानंतर आलेल्या सरासरी किमती तक्ता क्र. एक मध्येदिलेल्या आहेत. या लेखातील तक्ता क्र. एक मध्ये दर्शविल्याप्रमाणे पाण्याचा सामू पाण्यातील विद्राव्य मूलद्रव्य, पाण्याची काठिण्यपातळी, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्लोराइड्स, लोह, सल्फेट्स इ. अशा अनेक रासायनिक घटकांचा अभ्यास केला आहे.

मिळालेल्या निष्कर्षाची तुलना ही जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आरोग्य संघटना, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी पिण्याच्या पाण्याच्या ठरवून दिलेल्या प्रमाणित निकषांबरोबर करण्यात आली. त्यातून असे दिसून आले, की पाणलोट क्षेत्रामध्ये मूलस्थानी जलसंवर्धनातून उपलब्ध होणारे पाणी हे चांगल्या गुणवत्तेचे असते. त्याचा मानवी आरोग्यासह शेती उत्पादकतेवर अतिशय चांगला परिणाम दिसून येतो.

नुसत्याच पाण्याची उपलब्धतेपेक्षाही चांगल्या गुणवत्तेच्या पाण्याचे मूल्य अधिकच मानले पाहिजे. कारण या पूर्वीच्या लेखामध्ये आपण आंतर-नदी जोड प्रकल्प व त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम याबाबत माहिती घेतली आहे. या गंभीर परिणामांचा विचार करता पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून उपलब्ध होणारे पाणी हे पर्यावरणपूरक ठरते.

त्यामुळे स्थानिक पातळीवर केलेले जलसंधारणाचे हे उपाय मोठ्या नदी जोड प्रकल्प किंवा मोठ्या धरणांसारख्या अन्य पद्धतीपेक्षा उजवी ठरतात. पाण्याचे मूलस्थानी संरक्षण केल्यामुळे इतर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, वीज, कालवे, उत्खनन इ. गोष्टी वाचतात.

ज्या ठिकाणी असे बाहेरून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे, अशा ठिकाणी क्षारपड जमिनी, आम्ल व अल्कलीधर्मीय जमिनी तयार होत आहेत. भारतामध्येसिंचित क्षेत्रांमध्ये या गंभीर समस्या व त्याचे परिणाम वातावरणीय बदलास कारणीभूत ठरत आहेत. त्याविषयी पुढील लेखांमध्ये माहिती घेऊ.

(संदर्भ - Geo-hydrochemistry of KR२२, KR२५, KR३४ and BM११४ Watersheds, Bionano Frontier) - डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे) - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bajarbhav : सोयाबीनला ६ हजार भाव देणं सरकारला शक्य; सरकारने १३ हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला ६ हजार भाव मिळेल

Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

Soybean Crop Damage : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली

Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

SCROLL FOR NEXT