Sugar Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Union Budget 2024 : साखर उद्येागाचे प्रश्‍न प्रलंबितच

Sugar Industry : केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात साखर उद्येागाच्या प्रश्नांबाबत काहीही विचार झालेला नाही.

Team Agrowon

Pune News : केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात साखर उद्येागाच्या प्रश्नांबाबत काहीही विचार झालेला नाही. साखर उत्पादनाचे नवीन अंदाज आले असून त्यानुसार देशात ३१० ते ३२० लाख टन साखर (२० लाख टन इथेनॅालसाठी वर्ग हेाणारी साखर सेाडून) उत्पादन हेाणार आहे.

२०२३-२४ मधील शिल्लक स्टॅाक ५७ लाख टन आहे म्हणजे एकूण उपलब्धता ३६७ ते ३७७ लाख टन हेाईल. देशात २७५ ते २८० लाख टन साखर लागते. ती वजा जाता देशात ९० ते १०० लाख टन साखर शिल्लक राहील.

पुरेशी साखर निर्मिती हेाणार असल्याने स्थगित केलेली उसाचा रस, सिरप व बी हेवी मेालॅसिस वापरून करावयाची इथेनॅाल निर्मिती पूर्वीप्रमाणे सुरू करण्याबाबतचा निर्णय हेाणे अपेक्षित हेाते पण त्याचा विचार झालेला नाही.

कारखान्यांनी इथेनॅाल ब्लेडिंग कार्यक्रमाच्या आधारे मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवून प्रकल्प उभे केले आहेत. त्यांचे हप्ते व व्याज भरणे कारखान्यांना अडचणीचे झाले आहे. शिवाय इथेनॅाल निर्मितीमधून मिळणारे उत्पन्न विचारात घेऊन कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा उसाचे दर जाहीर केले आहेत. त्याची पूर्तता करणे अडचणीचे होणार आहे.

बाजारातील साखरेचे दर ३६५० रुपये प्रतिक्विंटलवरून ते ३४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कारखान्यांचा उत्पादन खर्च ३७०० रुपये प्रतिक्विंटल आहे. केंद्र शासनाने २०१९ मध्ये ठरविलेलेल्या ३१०० रुपये प्रतिक्विंटल एफआरपीत अद्यापही बदल केलेला नाही. एफआरपीत मात्र चार वेळा वाढ करून २७५० वरून ३१५० रुपये प्रतिटन पर्यंत वाढविलेली आहे. त्यामुळे कारखान्यांना तोटा सहन करून उसाची बिले कर्जे काढून आदा करावी लागत आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या आर्थिक अडचणी वाढून ‘एनपीए’च्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे उसाची एफआरपी खर्चावर आधारित वाढ करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात अपेक्षित होता, पण त्याचाही विचार झालेला नाही. एकंदरीत या अंतरिम अर्थसंकल्पात देखील साखर उद्योगाचे प्रश्न प्रलंबितच ठेवल्याने साखर उद्योगाची निराशाच झालेली आहे.
- पी. जी. मेढे, साखर उद्येाग अभ्यासक, कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Procurement: फुलंब्रीत मका खरेदी केंद्र सुरू

Childhood Memories: हातात हात धरून, नदी ओलांडलेलं बालपण...

Women Empowerment: स्त्रीकेंद्री उद्योगांच्या मुळावर घाव

West Bengal Election: पश्चिम बंगालमधील ‘युद्धा’ची नांदी

Crop Loan: गडबडगुंडा पीककर्जाचा!

SCROLL FOR NEXT