Agriculture Market Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Commodity Market : कापूस, हळद, तूर, टोमॅटो वधारले

Market Update : या सप्ताहात कापूस, हळद, तूर, टोमॅटो यांचे भाव वाढलेले आहेत.

डॉ. अरुण कुलकर्णी

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती : सप्ताह १९ ते २६ जानेवारी २०२४

या सप्ताहात कापूस, हळद, तूर, टोमॅटो यांचे भाव वाढले. हळदीचे फ्यूचर्समधील भाव या सप्ताहातसुद्धा लक्षणीय वाढले. या वाढीचा पुन्हा एकदा फायदा करून घेण्याची संधी आहे. २२ सप्टेंबरपासून कापसाचे भाव वाढत आहेत; परंतु सोयाबीनचे भाव मात्र घसरत आहेत.

कापसाचे फ्यूचर्स भावसुद्धा वाढते आहेत. मका, मूग, तूर व टोमॅटो यांचे भाव वाढत आहेत. या सप्ताहात कांद्याची आवक वाढली, त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले. २६ जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात १.३ टक्क्याने वाढून रु. ५६,००० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव रु. १ टक्क्याने वाढून रु. ५८,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.९ टक्क्याने वाढून रु. १,३९१ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६० वर कायम आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १२.२ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव फेब्रुवारी व एप्रिलमधील भावापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,२०० वर कायम आहेत. फ्यूचर्स (फेब्रुवारी) किमती रु. २,२१२ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. २,२३२ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.३ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात १.१ टक्क्याने वाढून रु. १३,०२३ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या पुन्हा ६.२ टक्क्यानी वाढून रु. १३,८२९ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ६.८ टक्क्यांनी वाढून रु. १६,०१८ वर आल्या आहेत. जून किमती रु. १६,२०६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १७.२ टक्क्यांनी जास्त आहेत. या तेजीचा फायदा करून घेता येईल.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात १.८ टक्का वाढून रु. ५,७०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) ०.८ टक्क्याने घसरून रु. ८,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात २.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,८१० वर आली होती. या सप्ताहात ती ०.३ टक्क्याने घसरून रु. ४,७९८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ८,७८४ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ५.६ टक्क्यांनी वाढून रु. ९,२७५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीचा आवक हंगाम सुरू झाला आहे. २९ डिसेंबरपासून आवक वाढती आहे. या वर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने साठवणुकीसाठी सुद्धा मागणी वाढली आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,४२० होती; या सप्ताहात येथील किंमत मोठ्या प्रमाणात घसरून रु. १,०८९ वर आली आहे. आवक वाढलेली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,५२० वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,९०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT