Garlic Price Agrowon
ॲग्रो विशेष

Garlic Price : पुण्यातील किरकोळ बाजारात लसणाला प्रतिकिलो ४०० रुपये भाव!

Garlic Retail Market : शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान लसूनाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना थोडाला दिलासा मिळत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लसणाचे दरात तेजी दिसत असून वाढले आहेत. यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सध्या किरकोळ बाजारात लसणाचा दर हा ४०० रुपये प्रतिकिलो आहे.

गेल्या काही महिन्यापासून लसणाच्या दरात वाढ होत असून आता कुठे शेतकऱ्यांच्या लसणाला भाव मिळत आहे. गेल्या दोन वर्षात यात सुधारणा नव्हती. तर लसूण घाऊक बाजारात फक्त ५० ते ८० रुपये किलोने मिळत होता. यात मागिल तीन महिन्यापूर्वी वाढ झाली आहे. मागच्या दोन वर्षांपेक्षा यंदा दरात ३२० ते ३५० रूपयेंची वाढ झाली आहे.

तीन महिन्यात दरात तेजी

गेल्या दोन वर्षात लसणाला चांगला दर मिळत नव्हता. तर लसूण घाऊक बाजारात फक्त ५० ते ८० रुपये किलोने मिळत होता. यात गेल्या आठ महिन्यांत ८० ते १०० रुपये वाढ झाली. यानंतर आता बाजारात लसूण ३६० ते ४०० रुपये प्रतिकिलो मिळत आहे.

लागवड न केल्याचा परिणाम

गेल्या दोन वर्षात लसणाचे पडणारे भाव आणि उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरवली होती. यामुळे बाजारात लसणाची कमतरता जाणवत आहे. याचा थेट परिणाम लसणाच्या भावावर झाला आहे. यामुळे बाजारात लसणाचे भाव वाढले आहेत.

लसणाच्या पाकळ्यांनाही २०० भाव

सध्या चांगला लसूण हा ३६० ते ४०० रुपये प्रतिकिलो मिळत आहे. यामुलळे बाजारात चांगल्या लसणाऐवजी लसणाच्या पाकळ्यांनाही मागणी वाढली आहे. या पाकळ्यांनाही २०० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT