Aslam Abdul Shanedivan
हिवाळा अनेक रोग आणि संक्रमण घेऊन येतो. अशा परिस्थितीत लसणाच्या फक्त २ पाकळ्या खाने अरोग्यास फार फायदेशीर ठरू शकते.
लसूण केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असून त्यामुळे फ्लू, सर्दी, खोकला हे दुर राहण्यास मदत होते.
लसणाच्या दररोज फक्त २ पाकळ्या खाल्याने हृदय, मेंदू आणि स्नायूंसाठी फार फायदेशीर आहे. लसणामुळे शरीरातील ट्रायग्लिसराईडची पातळी कमी होते.
यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. agrowon
लसणात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि तांबे यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्यात व्हिटॅमिन सी आणि बी ६ आढळतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
लसूण शरीराला मौसमी संसर्गापासून वाचवते. अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने, लसूण ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते.
कच्चा लसूण खाण्याचा त्रास होत असेल तर त्यापासून चहा तयार करून प्यावा. चहासोबत लसणाचे सेवन केल्याने सर्व प्रकारचे पोषक तत्व मिळू शकतात.