NAMO Shetkari Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

NAMO Shetkari Scheme : ‘नमो शेतकरी महासन्मान’चा चौथा हप्ता दोन दिवसांत

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील जवळपास ९० लाख ८८ हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. वित्त विभागाने हप्ता देण्यास मान्यता दिल्याने पैसे वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती. पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना राबविण्याची घोषणा करून प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मागील वर्षी तीन तर यंदा चौथा हप्ता देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी पाचवा हप्ताही देण्यात येणार असल्याचे समजते.

चौथ्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या १७ व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसानसाठी राज्यातील ९० लाख ५० हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यातील काही शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचेही पेसै आले होते.

त्यामुळे नमो शेतकरी महासन्मानच्या तिसऱ्या हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दोन हप्त्यांचा लाभ मिळेल, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएम किसानच्या १७ व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील ९१ लाख ४४ हजार ४४७ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी ९० लाख ८८ हजार ४२ शेतकऱ्यांना हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे तेवढ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे वाटप होणार आहे.

आचारसंहितेआधी पाचवा हप्ता

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. मात्र केवळ एकाच हप्त्याच्या वितरणाला वित्त विभागाने सोमवारी (ता. १९) मंजुरी दिल्याचे समजते. पाचवा हप्ता पुढील महिन्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Guaranteed Price : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला? शेतकरी ६ हजारांवर ठाम, संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार

Proso Millet : आरोग्यदायी पौष्टिक भगर

Poultry Farming: कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक

Horticulture : द्राक्ष, डाळिंब शेतीत शिंदे बंधूंचा लौकिक

Sangli Coconut Auction : कोथिंबिरीची जोडी १० हजार ५०० तर एक नारळ ६५ हजारांना, काय आहे हा विषय?

SCROLL FOR NEXT