Namo Shetkari Samman Nidhi : ‘नमो शेतकरी निधी’ची प्रतीक्षा

Farmers Waiting for Funds : पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही. नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना ओढ लागली आहे.
Namo Shetkari Nidhi
Namo Shetkari Nidhi Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : जव्हार तालुक्यात आजही खरीप हंगामातील शेतीवर अनेक कुटुंब अवलंबून आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील १२ हजार ६०० शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. त्यानुसार मागील वर्षी सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली.

त्याचा पहिला, दुसरा हप्ता टप्प्याटप्प्याने दिला. त्यानंतर २८ फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीआधी दोन्ही एकदम हप्ते दिले. मात्र, पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही. नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना ओढ लागली आहे.

Namo Shetkari Nidhi
Namo Shetkari Sanman : पीएम किसानची कॉपी, नमो शेतकरी सन्मानपासून हजारे शेतकरी वंचीत, लाखो रूपये अडकले

शेतकऱ्यांची शेती ही हवामानावर अवलंबून असते. पोषक हवामान मिळाले, तरच शेतीत चार पैसे मिळतात. त्यातच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित आवश्यक तो हमीभाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही चांगले मिळत नसल्याने त्यांनी काढलेली कर्जे भरली जात नाहीत.

Namo Shetkari Nidhi
Agriculture Fund : देशातील ३१ राज्यात भाजीपाला आणि फळपिकांची साठवणूक व्यवस्था उभारली: केंद्रीय कृषिमंत्री चौहान

त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गतच राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. त्याचे तीन हप्ते आतापर्यंत देण्यात आले. मात्र, जूनमध्ये पेरणीसाठी राज्याचा हप्ता मिळेल, अशी आशा होती. मात्र, पाच महिने झाले, तरीही हप्ता मिळालेला नाही.

राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता फेब्रुवारीनंतर मिळालेला नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी उसने-पासणे करून, कर्ज काढून पैसे घेतले आहेत. सध्या पेरणीनंतर आंतरमशागत आणि खते, कीटकनाशके फवारणीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीची आस लागली आहे.
मिलिंद बरफ, लाभार्थी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com