Jalgaon News: गिरणा पट्ट्यासाठी ‘गिरणा’ धरणातून काही दिवसांपूर्वी नदीत दोन हजार क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी नदीच्या शेवटच्या भागात किंवा कानळदा (ता.जळगाव) गावापर्यंत पोहोचले आहे. .गिरणापट्टा पाण्यासाठी कासावीस होते. पण यंदा गिरणा धरण १०० टक्के भरले होते. नदीही प्रवाही होती. त्यात आवर्तने मिळत असल्याने याचा लाभ नदीकाठच्या भागास होत आहे. गिरणा धरणातून दुसरे आवर्तन केव्हा सोडण्यात येते याकडे लागले होते. निम्मा जळगाव जिल्ह्याची पाण्याची तहान गिरणा धरणावर अवलंबून आहे. .Girna Dam : गिरणा धरणातून आवर्तन सुटणार .यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. धरणातून पिण्याच्या पाण्यासह रब्बीसही आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला होता. धरणातून तिसरे आवर्तन एप्रिलमध्ये सुटेल. गिरणा पट्ट्यात सध्या तीव्र पाणीटंचाई कुठेही जाणवत नाही. परंतु प्रशासनाचा निर्णय व गिरणा पट्ट्यातील मागणी यासाठी नदीत दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते..कानळदापर्यंत पाणीगिरणातून २००० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. ते जळगाव तालुक्यातील कानळदापर्यंत पोचले आहे. त्यामुळे गिरणा काठावरील गावांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. सद्य:स्थितीला काठावरील काही गावांना किरकोळ टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाचोरा व अन्य शहरांसह नदीकाठच्या गावांनाही नदीतील पाण्याने दिलासा मिळतो. पावसामुळे गिरणा नदी वाहत होती. पाणी पातळी नदीकाठी यंदा स्थिर आहे. त्यात या आवर्तनाची भर पडत आहे..Girna Dam : गिरणा धरणात पाण्याची आवक.धरणात मुबलक पाणीसाठागिरणा धरणात सद्य:स्थितीला पाणीसाठा मुबलक आहे. जिवंत पाणीसाठा वगळता सुमारे तीन हजार दशलक्ष घनफूट एवढा मृत साठा आहे..तिसरे एप्रिलमध्ये, तर चौथे आवर्तन मे महिन्यातयंदा गिरणा धरणातून बिगर सिंचनासाठी चार आवर्तन सोडण्यात आलेला आहेत. आतापर्यंत दोन आवर्तन सोडण्यात आलेले आहेत. तिसरे आवर्तन एप्रिलमध्ये सोडण्यात येणार आहे. तर मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चौथे आवर्तन सोडता येणार आहे. सद्यःस्थितीत धरणात सुमारे ६८ टक्के पाणीसाठा आहे. एका आवर्तनाला १० ते १२ टक्के पाणीसाठा लागतो. त्यामुळे हे आवर्तन सोडल्यानंतर पाणीसाठा कमी होणार आहे. पुढे पावसाळा लांबल्यास जूनमध्ये पाचवे आवर्तन सुटू शकते. गिरणा धरणावर चाळीसगाव नगर परिषद, जळगाव महापालिका, नांदगाव व सुमारे ५६ गावे, दहिवाळ व २५ गावे पाणी योजना अवलंबून आहे. याशिवाय भडगाव, पाचोरा शहरासही या धरणातून पाणी दिले जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.