Jalgaon News: खानदेशात उष्णता सतत वाढत आहे. यामुळे शेतीकामांच्या वेळेत बदल केले जात आहेत. पिके रब्बी हंगामात जोमात उभी झाली आहेत. यातच शेतीकांनाही फटका बसत असून, शेतकरी सकाळी लवकर कामे उरकून घेत आहेत. .रब्बी हंगामात कापणी, मळणीची कामे सुरू आहेत. तसेच केळी लागवड, कलिंगड, पपईची काढणी, तणनियंत्रण, पिकात सिंचन आदी कामे सुरू आहेत. ही कामे हिवाळ्यात किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी शेतकरी दिवसभर आवरून घेत होते. परंतु मागील सात ते आठ दिवसांत उष्णता सतत वाढली आहे..Summer Temperature Rise: तापमानात वाढ शक्य; उन्हाळी हंगामास सुरुवात.सकाळीच कामांना सुरुवातरब्बी पिके पक्व होत असून, उन्हाळ पिके शेतात आहेत. त्यांची कापणी, काढणीचे काम सुरू आहे. उशिरा लागवडीचा कांदा, बाजरीचे पीक शेतात पक्व होत आहे. काही भागात मजूरटंचाई आहे. तर काही भागात अधिकची मजुरी देवून मजूर आणावे लागत आहेत. अशात मजूरमंडळी सकाळी लवकर कामे करीत आहे..Rising Temperature in Maharashtra: राज्यात उन्हाचा कहर; तापमान वाढीमुळे नागरिक हैराण.सूर्य कोपलामजूरटंचाई असतानाच सूर्यही कोपला आहे. सकाळी ११ वाजेपासून उन्हाचे चटके बसतात. सकाळी ११ पासून ऊन तापते. खानदेशात सध्या रोज ३५ ते ३६ अंश सेल्सीअस एवढे तापमान आहे. मध्यंतरी काही भागात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान होते. दुपारनंतर उष्ण झळा बसतात. .याचाही फटका फळे, भाजीपाला पिकांना बसत आहे. हलक्या जमिनीत अधिकची हानी उष्णतेने होवू लागली असून, पाणी काटेकोरपणे व व्यवस्थितपणे द्यावे लागत आहे. कमाल शेतकरी बागायती पिकांसाठी ठिबकचा उपयोग करतात. जुनी ठिबक व्यवस्थित कार्यरत असावी, त्याचे बंद असलेले ड्रीप सिंचनक्षम व्हावेत यासाठी शेतकरी ठिबकची स्वच्छता करून घेत आहेत. एका शेतात सुरू असलेली कार्यवाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.