Life  Agrowon
ॲग्रो विशेष

Life : जगण्याचं तत्त्वज्ञान

रात्रीपासून आकाशात ढग आहेत. सकाळी उठलो तेव्हा पावसाळी वातावरण होतं. मध्येच सूर्य डोकावत असल्याने, ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. गबरू आणि ज्ञानेश्वर ला बळबळंच तळ्यावर घेऊन गेलो.

Team Agrowon

रात्रीपासून आकाशात ढग आहेत. सकाळी उठलो तेव्हा पावसाळी वातावरण होतं. मध्येच सूर्य डोकावत असल्याने, ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. गबरू आणि ज्ञानेश्वर ला बळबळंच तळ्यावर घेऊन गेलो. काहीवेळ फिरून ती परतली. मी यु-ट्युबवर जुनी गाणी ऐकत फिरत होतो. निसर्गातला एकांत. कितीही फिरत राहिलं तरी थकवा येत नाही. शुद्ध हवेचा हा परिणाम असावा. मोबाईलवर गाणं लागलं होतं... बादल की तरह... आवारा फिरू... आकाशात मुक्तपणे फिरत असलेल्या ढगांकडं बघत बसलो. ढगांसारखं मला फिरता येईल? तेही माणसांच्या जगात! किती कठीण आहे. शालेय आयुष्यातच आवारा ही पदवी मिळालीय. मोठं कौतुक आहे मला या शब्दाबद्दल. खरं तर या शब्दाचा जो अर्थ मी समजून घेतलाय तो खासच आहे. कुठल्याही कथीत बंधन, मोहापलीकडं मुक्तपणे जगणं म्हणजे आवारा असणं! किती कठीण असतं हे आवारा बनणं.

गेल्या आठवड्यात एका गंभीर विषयावर चर्चा करताना मित्र म्हणाला, तू नेमका कोणाचा फॉलोअर आहेस? तुझं जगण्याचं तत्त्वज्ञान काय? मी म्हटलं, फारच अवघड प्रश्न विचारलास पण सांगतो, माझा कोणीच गुरू नाही. कुठलाच माणूस, तत्त्वज्ञ, महापुरुष परिपूर्ण नाही. त्यामुळे मी कोणाचंच शिष्यत्व स्वीकारलेलं नाही. मात्र, ज्याचं जे जे भावतं, पटतं ते ते मी घेतो. ते जगण्यात सहजतेने उतरवण्याचा प्रयत्न करतो. मी जगतो तेच माझं तत्त्वज्ञान. माझे विचार आणि जगणं यात द्वंद नाही. माझं जगणं बघितलं की, तुला माझं तत्त्वज्ञान कळेल. अर्थात हे सगळं माझ्यासाठीच आहे. मला कोणाला काही सांगण्यात, पटवण्यात, बदल घडवून आणण्यात रस नाही. मी माझ्यातच अडकलेला आहे. निसर्गात राहिलं की, असं मन प्रसन्न राहतं. घाणीपासून दूर राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

- महारुद्र मंगनाळे, रुद्रा हट, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT