Team Agrowon
फोटो : ऐश्वर्या भोसले
खळखळून हसायला वयाने लहान किंवा मोठा असा काही संबंध नसतो. नव्हे तो नसावाच.
माणसाचं मन मोठं असलं पाहिजे पण तरीही, दिलं तो बच्चा है जी सारख जगताही आल पाहिजे.
कामातून उसंत काढून पोटाची खळगी भरावी लागते. वेळेवर जे मिळेल त्यात आनंद मानला की दिवस मजेत जातो.
रस्त्यावरून जाताना दोन शब्द बोललं की अंतरही कमी वाटतं.
ऊन असो की पाऊस स्वतःच्या बचावासाठी छत्री किंवा रेनकोट चालत नाही. आपला गोणपाट केव्हाही बरा.
दगडावर सुध्दा आपलं नशीब कोरावं लागतं, तेव्हा कुठे आयुष्य उमेदीत जातं.
प्रवासात चालू थकल्यावर दोन क्षण आसऱ्याचं ठिकाणं मिळालं की बरं वाटतं.