Pesticides Agrowon
ॲग्रो विशेष

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Central Pesticides Board and Registration Committee : केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीने कीडनाशकांच्या ‘लेबल’वर पाण्याच्या सामूबाबत माहिती नोंदविण्याची सूचना केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कीडनाशकाची परिणामकारकता साधण्यासाठी पाण्याचा सामू (पीएच) महत्त्वाचा ठरतो. या संदर्भाने शेतकरी संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीने कीडनाशकांच्या ‘लेबल’वर पाण्याच्या सामूबाबत माहिती नोंदविण्याची सूचना केली आहे. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या संबंधीचे निर्देश देण्यात आले.

कीडनाशकांची परिणामकारकता साधण्यासाठी पाण्याचा सामू (पीएच) हा महत्त्वाचा घटक असतो. त्यादृष्टीने आदर्श अशा संतुलित सामू असलेल्या पाण्याचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. मात्र पाणी अल्कधर्मी असल्यास कीडनाशकाचा अपेक्षित परिणाम साधला जात नाही. ही बाब लक्षात घेता शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी या संदर्भाने पाठपुरावा केला होता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन खासदार भावना गवळी, नवनीत राणा, आमदार मदन येरावार, डॉ. सी. डी. मायी यांच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समिती (सीआयबीआरसी) त्यासोबतच भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे सातत्याने पत्रव्यवहार करीत ही बाब बिंबविण्याचा प्रयत्न केला. या साऱ्याच्या परिणामी ‘सीआयबीआरसी’च्या नुकत्याच पार पडलेल्या ४५८ व्या बैठकीत कीडनाशक फवारणीसाठी पाण्याच्या सामूचे (पीएच) महत्त्व या विषयावर मंथन झाले. त्याआधारे कृषी रसायन उद्योगातील कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या लेबल आणि माहितिपत्रकावर फवारणीच्या पाण्याचा योग्य सामू किती असावा ही माहिती नोंदविण्याची शिफारस वजा सूचना करण्यात आली आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीच्या सचिवालयातील अभ्यासाअंती नोंदविलेल्या निष्कर्षांचा हवाला देत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिलिंद दामले यांनी या संदर्भाने कृषीच्या गुणवत्ता नियंत्रण व निविष्ठा संचालकांच्या स्तरावरही पाठपुरावा केला होता. त्याआधारे कृषी विभागाने ‘आयसीएसआर’कडे पाठपुरावा केला. त्यामुळेही यंत्रणावर दबाव वाढत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

फवारणीच्या पाण्याचा सामू हा कोणत्याही कीडनाशकाच्या परिणामकारकतेचा महत्त्वाचा घटक मानला जातो. पाणी क्षारयुक्त असल्यास फवारणीचे द्रावण प्रभावी ठरू शकत नाही. अशावेळी कीडनाशके परिणामकारक नसल्याकडे बोट दाखवले जाते. कीडनाशकांच्या लेबलवर पाण्याच्या पीएत संदर्भात सूचना असणे अनिवार्य असेल तर बाजारातील उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना पाण्याचा सामू संतुलित करणे शक्य होईल. या संदर्भाने सातत्याने पाठपुरावा होऊन त्याला यश मिळाले आहे.
डॉ. चारुदत्त मायी, माजी अध्यक्ष, भारतीय शास्त्रज्ञ निवड समिती मंडळ, ‘आयसीएआर’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

NCCF Onion Procurement : ‘एनसीसीएफ’कडूनही माहिती देण्यास टाळाटाळ

MahaDBT : महा़डीबीटीकडून पूर्वसंमतीसाठी अडीच हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया संथ

SCROLL FOR NEXT