Kharif Season : कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावे

Agriculture Department : वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला तसेच जनावरे दगावलेल्या पशुपालकांना मदतीचे वाटप करण्यात आले.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Latur News : खरीप हंगाम शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हंगामात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व पिकांवरील कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केली. उदगीर व जळकोट तालुक्याच्या खरीप हंगामाचा आढावा घेताना ते बोलत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, कृषी विकास अधिकारी सुभाष . चोले, तहसीलदार राम बोरगावकर, सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, नरेंद्र मेडेवार, कार्यकारी अभियंता एम. एम. पाटील, सायस दराडे, उपविभागीय कृषी अधिकारी आर. एन. काळे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, आकाश पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे उपस्थित होते.

Agriculture Department
Kharif Season : राज्यात सोमवारपासून कृषी संजीवनी पंधरवडा

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे आणि रासायनिक खते उपलब्ध करून तुटवडा व बोगस बियाणे व खते विक्री होवू नये, यासाठी प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर एका कृषी सहाय्यकाची नेमणूक करावी. उपलब्ध बियाणे व खतांची माहिती कृषी सेवा केंद्रांवर प्रसिद्ध करावी.

Agriculture Department
Review of Kharif : खरिपाच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ

भरारी पथकांनी सक्रिय राहून गैरप्रकार रोखावेत, बीजप्रक्रिया, पेरणीची योग्य पद्धती, कीड रोग व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे आदी सुचना श्री. बनसोडे यांनी दिल्या. वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला तसेच जनावरे दगावलेल्या पशुपालकांना मदतीचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय खाद्यतेल गळीतधान्य अभियानातून अनुदानावरील सोयाबीनचे बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांवर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रगतशील शेतकरी श्याम सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला. शंखी गोगलगाय नियंत्रणावरील जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे उद्घाटनही श्री. बनसोडे यांच्या हस्ते या वेळी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com