Illegal Pesticides License Fees : परवाना नूतनीकरणावरील शुल्क वसुली बेकायदेशीर

License Renewal Fees : कीटकनाशकांचे उत्पादन व विक्री परवान्याचे नूतनीकरण करताना काही राज्यांमध्ये सर्रासपणे साडेसात हजार रुपये शुल्क उकळले जात आहे.
License Renewal Fees Illegal
License Renewal Fees IllegalAgrowon
Published on
Updated on

Pune News : कीटकनाशकांचे उत्पादन व विक्री परवान्याचे नूतनीकरण करताना काही राज्यांमध्ये सर्रासपणे साडेसात हजार रुपये शुल्क उकळले जात आहे. केंद्र शासनाने ही बेकायदा शुल्क वसुली तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव यांनी देशातील सर्व कृषी खात्याच्या संचालकांना एक पत्र पाठवले आहे.

‘‘कीटकनाशकांच्या उत्पादन व विक्रीसाठी दिलेल्या परवान्याचे नूतनीकरण करताना काही राज्यांमधील परवाना अधिकारी अद्यापही साडेसात हजार रुपये शुल्क आकारत आहेत. मात्र या बाबत केंद्र शासनाने ५ नोव्हेंबर २०१५ रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. परवाना अधिकाऱ्यांनी या अधिसूचनेचे पालन करावे,’’ असे केंद्रीय सचिवांनी सूचित केले आहे.

License Renewal Fees Illegal
Pesticide Selling Licence : कीटकनाशके विक्रेत्याच्या मृत्यूनंतर परवान्याचे हस्तांतर

कीटकनाशके कायदा १९६८ मधील तरतुदीनुसार परवाना शुल्क आकारले जात होते. परंतु २०१५ या कायद्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. सुधारित तरतुदींमधून ‘नूतनीकरण’ हा शब्द वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे कीटकनाशकाचे उत्पादन किंवा विक्रीसाठी परवाना दिल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी पुन्हा शुल्क आकारण्याची तरतूद रद्द झालेली आहे. त्यामुळे विक्रेत्याकडून नूतनीकरण शुल्क आकारले गेल्यास शुल्क वसुली बेकायदेशीर ठरते. असे असूनही अनेक राज्यांमधील गुणनियंत्रण विभागाचे परवाना अधिकारी सर्रासपणे या तरतुदीकडे दुर्लक्ष करीत होते.

License Renewal Fees Illegal
Pesticide Licence : तीन विक्रेत्यांचे परवाने निलंबित

ऑल इंडिया इनपुट डीलर्स असोसिएशनकडून या बाबत केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालयातील पीक संरक्षण विभागाने या गोंधळाची माहिती घेणे चालू केले. असोसिएशनची तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता सर्व राज्यांना शुल्क वसुली रोखण्याबाबत केंद्राने सूचना जारी केल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयाचे राज्यातील कीटकनाशके उत्पादक व विक्रेत्यांना स्वागत केले आहे.

अनेक राज्यांमध्ये सर्रासपणे परवाना नूतनीकरण शुल्क घेतले जात होते. ही गंभीर बाब आम्ही केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आता केंद्राने स्पष्ट सूचना दिल्यामुळे विक्रेत्यांना बसणारा शुल्क कायमचा थांबणार आहे.
मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, ऑल इंडिया इनपुट डीलर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com