Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : देशातील जनता सध्या प्रचंड अस्वस्थ : पवार

Sharad Pawar : देशातील लोक अस्वस्थ आहेत. यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे,’’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

Team Agrowon

Nagar News : ‘‘भाजपकडून सातत्याने सांगितले जाते, की लोकसभेच्या ४१५ जागा जिंकणार. मात्र देशातील अनेक राज्यांत भाजप नाही, काही राज्यांत असले तरी तेथे ते स्वतःच्या ताकदीवर नाही. मोदींशिवाय पर्याय नाही हा केला जाणारा प्रचार खोटा आहे. देशातील लोक अस्वस्थ आहेत. यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे,’’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शिर्डी (जि. नगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनदिवसीय शिबिराचा गुरुवारी (ता.४) शरद पवार यांच्या भाषणाने समारोप झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, खासदार अमोल कोल्हे, फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘खरे पाहिले तर देशात भाजपला फारसे लाभदायक चित्र नाही. हाती सत्ता आल्यावर सत्तेच्या माध्यमातून लोकांची फसवणूकच करण्याचे काम भाजपने केले आहे. आता हे लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. देशाने याआधीही असे अनेक प्रकार पाहिले आहेत. लोक धडा शिकवतात.’’ ‘‘राज्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांना आश्वासन दिले होते. आज मात्र राज्यकर्ते वेगळी भूमिका घेत आहेत.,’’ असेही श्री. पवार म्हणाले.

आरक्षणाबाबत सरकारची भूमिका नाऊमेद करणारी

श्री. पवार म्हणाले, ‘‘धनगर आरक्षणाची घोषणा होऊन किती वर्षे लोटली, अजून प्रश्न सोडवला नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मुस्लिमांनाही आरक्षण दिले पाहिजे. सरकारची भूमिका लहान घटकांबाबत नाऊमेद करणारी आहे. या लोकांची विचारधारा शाहू, फुले आंबेडकरांची नसून हिंदुत्वावर आधारित आहेत.

त्यासाठी सर्व क्षेत्रात खासगीकरण, खोट्या प्रचारातून मुस्लिम द्वेष, न्याय व्यवस्था, बॅंक, निवडणूक, ईडीचा वापर, मनुवादी, धर्माच्या नावाखाली देशाला मागे न्यायचे, पाकिस्तानाबद्दल आकस दाखवून देशातील लोकांना भीती दाखवायची असा पाच कलमी कार्यक्रम सुरू आहे. देशात महिलांचा अपमान केला जात आहे.’’

श्री. पवार म्हणाले...

मोदींना हरवण्यासाठीच ‘इंडिया आघाडी’

इंडिया आघाडी हा देशाला पर्याय

पंधरा दिवसांत बैठका, निवडणुकीला कसे सामोरे जायचे होणार

वंचितला बरोबर घेणार, चर्चा चालू

कोणत्याही परिस्थितीत मोदींना सत्तेवरून हाटवायचे आहे.

शेतकरी, तरुण, महिला, अल्पसंख्याक, महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता, उद्योगपतींची कर्जमाफी यावर विशेष कार्यक्रम घेणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT