Sharad Pawar : राज्यघटनेचा, समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू

Balasaheb Gaikwad : रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला. त्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Nagar News : ‘‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवीदृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला केला. त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु. येथे मंगळवारी (ता.२) रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला. त्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Sharad Pawar
Drought Update : मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण कडू, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षाताई रुपवते, गणपतराव सांगळे, सुधीर मस्के, अशोकराव गायकवाड, वैशाली गायकवाड, सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Sharad Pawar
Cotton Agriculture Technology : ‘कापूस पिकासाठी यांत्रिकीकरण काळाची गरज’

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘शरद पवार साहेबांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. राज्यभरातील हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली आहे. सर्वसामान्यांचा सन्मान करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून कृषिमंत्री पदाच्या काळात सहा वर्षे पवार साहेबांबरोबर काम करताना राज्यात विक्रमी कृषी उत्पन्न केले.’’

प्रास्ताविक विजय हिंगे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर राहुल जऱ्हाड यांनी आभार मानले .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com