FRP Issue Ageowon
ॲग्रो विशेष

FRP Issue : सोलापूर जिल्ह्यात ‘एफआरपी’ देण्याची गती संथच

Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम संपून कारखानापरत्वे तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला.

Team Agrowon

Solapur Sugar Mill News : सोलापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम संपून कारखानापरत्वे तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही एफआरपीची पूर्ण रक्कम देण्यात अजूनही साखर कारखाने गती घेत नसल्याची स्थिती आहे.

मे अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील हंगाम घेतलेल्या ३७ पैकी १७ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. बेसिक रिकव्हरीनुसार जिल्ह्यातील २० कारखान्यांकडे मेअखेर २८६ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. अंतिम साखर उताऱ्यानुसार सर्वच कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी आहे.

सध्या साखरेला असलेली अल्प मागणी व दरातही विशेष वाढ नसल्याने एफआरपी थकबाकी असणारे बहुतांश कारखाने आगामी हंगाम सुरू होईपर्यंत अंतिम साखर उताऱ्यानुसारची एफआरपीची पूर्ण रक्कम देऊ शकतील, याची शाश्वती नाही. यावर्षी एप्रिलपासून साखरेला मागणी व दर वाढले. त्या काळात साखरेला उठाव होता.

या काळात काही कारखान्यांनी साखर विक्री केली. हंगाम संपल्यावर एफआरपी देण्याबाबत कारखान्यांची गती मंद झाली आहे. एफआरपी देण्यास कारखाने टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कारखान्यांच्या पातळीवर शांतता आहे.

साखर विक्री विभागातही फारशी लगबग नाही. एफआरपी देण्याची गती अशीच मंदावलेली राहिल्यास अनेक कारखान्यांकडे पुढील हंगामापर्यंत थकबाकी कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हंगामाच्या थकबाकीचे ओझे अंगावर घेऊनच कारखान्यांना येणारा हंगाम सुरू करावा लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांना तातडीने एफआरपीची रक्कम मिळणे दुरापास्त आहे.

कारखानानिहाय ३१ मेअखेरची थकीत एफआरपी (कोटीत)

कारखाना - थकीत एफआरपी

सिद्धेश्वर- ७.४८

संत दामाजी - १.१९

मकाई- १८.५६

लोकनेते - ७.९५

सासवड माळी - ९.७६

सिद्धनाथ - १२.३८

इंद्रेश्वर - ९.२१

भैरवनाथ, विहाळ- १२.१२

भैरवनाथ, लवंगी- ५.०२

युटोपियन - १०.६७

मातोश्री - २१.२७

भैरवनाथ, आलेगाव - १७.३३

ओंकार - ०.५०

विठ्ठल रिफाईंड - ६२.६२

आष्टी शुगर - ७.३९

भीमा - ३८.९१

सहकार शिरोमणी - ३१.१९

धाराशिव, सांगोला -०.४६

श्री शंकर - ७.१४

विठ्ठल, वेणुनगर- ४.९१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT