Sugarcane FRP : उसाला प्रतिटन १९३४ ते २८२५ रुपये एफआरपी

Sugarcane Update : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी २०२२-२३ च्या हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाला प्रतिटन १९३४.४७ ते २८२५.०७ रुपये एफआरपी (रास्त किफायतशीर किंमत) दिली आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

Sugarcane Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी २०२२-२३ च्या हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाला प्रतिटन १९३४.४७ ते २८२५.०७ रुपये एफआरपी (रास्त किफायतशीर किंमत) दिली आहे.

कमी साखर उतारा, जास्तीचा ऊसतोड व वाहतूक खर्च असलेल्या साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी एफआरपी मिळाली आहे.

परभणी जिल्ह्यातील ७ खाजगी साखर कारखान्यांपैकी कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा शुगर्स या कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक म्हणजेच ११.८० टक्के तर सर्वात कमी म्हणजेच ९.५० टक्के साखर उतारा ट्वेन्टीवन शुगर्स, श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर, श्रीतुळजा भवानी शुगर या कारखान्यांचा आहे.

प्रतिटन ऊसतोड व वाहतूक खर्च सायखेडा (ता. सोनपेठ) येथील टवेन्टीवन शुगर्सचा सर्वाधिक ८८६.७८ रुपये असून बळिराजा शुगरचा सर्वात कमी ६९७.६८ रुपये आहे.

Sugarcane FRP
Sugarcane Supply : जीवघेण्या स्पर्धेमुळे ऊस पुरवठ्याची शाश्वती संपली

बळिराजा शुगर कारखान्याने सर्वाधिक प्रतिटन २८२५.०७ रुपये तर ट्वेन्टीवन शुगर्स कारखान्याने सर्वात कमी प्रतिटन १९३४.४७ रुपये एफआरपी दिली आहे. ता. ३० एप्रिल अखेर पर्यंत गंगाखेड शुगर्सने ९९.२३ टक्के, रेणुका शुगर्सने ९९.९७ टक्के एफआरपी अदा केली आहे.

योगेश्वरीने ८६.५१ टक्के, बळिराजाने ७०.७९ टक्के, श्रीलक्ष्मी नृसिंहने ९६.८८ टक्के, श्रीतुळजा भवानी शुगर्सने ९९.९४ टक्के, ट्वेन्टीवन शुगरने १०० टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांपैकी जवळा बाजार येथील कपीश्वर शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.८८ टक्के तर आहे. प्रतिटन ऊस तोड व वाहतूक खर्च सर्वाधिक वाकोडी येथील शिऊर साखर कारखान्याचा ७५६.८ रुपये तर कपीश्वर शुगर्सचा सर्वात कमी ६५४.०७ रुपये आहे.

कपीश्वर शुगर्सने सर्वाधिक प्रतिटन २५८८.०८ रुपये तर डोंगरकडा येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने सर्वात कमी २१०१.७६ रुपये एफआरपी दिली आहे. एप्रिल अखेर भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने ८९.६९ टक्के, पूर्णा कारखान्याने १०० टक्के, कपिश्वर कारखान्याने ८४.४३ टक्के, टोकाई कारखान्याने ४६.६६ टक्के रक्कम अदा केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com