Satara Crop Insurance agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Registration : गतवर्षीपेक्षा यंदा पीकविमा नोंदणीची गती कमी

Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. मात्र अखेरच्या टप्प्यात नोंदणीला गती आली आहे.

Team Agrowon

Nashik News : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. मात्र अखेरच्या टप्प्यात नोंदणीला गती आली आहे. तरीही अनेक भागात अद्याप पेरणी नाही. त्यात झालेल्या पेरणीच्या तुलनेत अपेक्षित पीक विमा अर्जांची नोंदणी झालेली नाही. मागील वर्षी ३० जुलै अखेर मुदत असताना ५ लाखांवर अर्ज आले होते. तर यंदा दोन दिवस मुदत राहिली असताना शुक्रवार (ता. १२) अखेर जिल्ह्यात ५ लाख पीक विमा अर्जांची नोंदणी झाली आहे.

शेतकऱ्यांकडून केवळ १ रूपया शेतकरी हिस्सा घेऊन लाभ घेता येणार आहे. या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान याबाबीपासून पिकास विमा संरक्षण मिळणार आहे. मात्र यंदा सुरुवातीला शेतकरी नोंदणी करताना काही सीएससी केंद्र चालकांनी शेकड्यात पैसे घेतल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

ॲग्रोवनने हा प्रकार समोर आणल्यानंतर कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेत क्षेत्रीय पातळीवर यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे नंतरच्या टप्प्यात या पीक विमा नोंदणीला गती मिळाली आहे.मात्र तरीही टक्का कमीच आहे. त्यात खोळंबलेल्या पेरण्या व सर्वर डाऊन चा फटका यामुळे ही नोंदणी काहीशी रखडल्याचे क्षेत्र आहे.

जिल्ह्यात १३३ महसूल मंडळे असून शेतकऱ्यांची संख्या १ लाख ७२ हजार ३० इतकी आहे. त्यात ६३४९ कर्जदार तर ३ लाख ४५ हजार ६५५ असे एकूण ३ लाख ५२ हजार ००४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ४२ हजार हेक्टर असून त्यापैकी ४ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा गत सप्ताहात झाला होता.

त्यापैकी २ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पीकविमा नोंदणी झाली आहे. त्यामुळे हे प्रमाण जवळपास निम्मे असल्याची स्थिती आहे. मागील वर्षी पीकविमा नोंदणी सुरू झाल्यानंतर ३१ जुलै अखेर ही नोंदणी करण्यात आली होती. यंदा १५ जुलैपर्यंत मुदत असणार आहे.

पीक विमा नोंदणीची तालुकानिहाय स्थिती (ता.१२ अखेर)

तालुका शेतकरी संख्या सहभागी कर्जदार शेतकरी सहभागी बिगर कर्जदार शेतकरी विमा संरक्षित क्षेत्र(हेक्टर)

बागलाण १७,३५० ५६५ २७,४५९ २२,६४४.३१

चांदवड १४,२८१ ५२४ ३४,४४१ १९,४०६.२५

देवळा १३,२९६ ५४२ २६,२१६ १६,५९६.९१

दिंडोरी ७०६ .४३ १,१७१ ८३८.६६

इगतपुरी ४,७७२ २०२ १०,१८४ ७,८५१.५६

कळवण १,६७७ १२८ २,९५६ २,३४८.८६

मालेगाव ३५,१९८ ७६९ ६३,७९५

नांदगाव २०,२१३ १,४६५ ४३,८१३ २९,९६०.१८

नाशिक ६१७ ८० १,१७९ १,८२९.३६

निफाड ६,४१७ २८६ ९,७१८ ७,७५३.८३

पेठ ४,२४१ ० ७,००६ ६,२९७.३८

सिन्नर २५,७८२ ८३७ ५३,५९४ ३५,७३१.६८

सुरगाणा ४,७७२ ० ६,४५३ ६,२७२.५९

त्रंबकेश्वर २,४६४ ३३ ४,३१८ ४,०७६.९२

येवला २०,२४४ ८७५ ५३,३५१ २८,९१२.१६

एकूण १,७२,०३० ६,३४९ ३,४५,६५५ २,३५,२५१.४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT