Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Nagar : नगरमध्ये गारपीट नुकसानीचा आकडा वाढतोय

Suryakant Netke

Nagar News : नगर जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे १५ हजार २९६ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, अजून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १९३ गावांतील सुमारे २९ हजार ३९० शेतकऱ्यांच्या पिकाला गारपिटीचा (Hailstorm) फटका बसला आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात आतापर्यंत जवळपास चार ते पाच वेळा जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या गारपिटीचा उन्हाळी पिकांसह गहू, कांदा, चारा, पिके, भाजीपाला, डाळिंब, संत्रा, लिंबू, आंबा यांसारखी फळपिकांना मोठा फटका बसला आहे.

खासकरून काढणीला आलेला गहू तसेच आंब्यासारख्या फळबागांचे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील १९३ गावांत २९ हजार ३९० शेतकऱ्यांच्या शेतीमधील १५,२९६ हेक्टरवर आतापर्यंत पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जून पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याने हा आकडा वाढणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ३३ टक्क्यांपेक्षा कमी २,२८९ शेतकऱ्यांचे ८१० हेक्टरवर नुकसान झाले आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त सुमारे सत्तावीस हजार शेतकऱ्यांचे १४, ४८६ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

गारपिटीचा पाथर्डी, नेवासा, शेवगाव, अकोले, नगर आणि पारनेर तालुक्यांला सर्वाधिक फटका बसला आहे. नेवासा तालुक्यात सर्वाधिक ९३५० शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान झाल्याची प्रशासनाकडे माहिती आहे.

सततच्या पावसाने सव्वादोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, त्याची अजून अनेक भागात मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून सात दिवसांत मदत देणार असल्याचे जाहीर केले.

महिनाभरातील गारपिटीनेही आतापर्यंत वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले याची सात दिवसांत मदत मिळणार का, मदत कधी मिळणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुकानिहाय नुकसान असे (हेक्टर)

पारनेर : २६८५, नगर : १४३७, पाथर्डी : २.८०, कर्जत: २५२, श्रीगोंदा : ३२२, जामखेड : ५१.९०, राहुरी : ८२३, नेवासा ४९२०, शेवगाव : २१९७, संगमनेर : ६६०, अकोले : ११०८, कोपरगाव : ४३२, राहता : ४०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाची गळती निघणार तरी कधी? ८० कोटी निधीचं काय झालं

Agriculture Technology : ‘सच्छिद्र निचरा’ तंत्रामुळे जमीन झाली क्षारपडमुक्त

Automatic Farming Machinery : स्वयंचलित यांत्रिकीकरणाची वाढवावी लागेल गती

Panchaganga Pollution : मैला, रक्त, काळे फेसाळलेले थेट पाणी पंचगंगा नदीत, प्रदुषण मंडळाकडून पाण्याची चाचणी

Electoral Process : निवडणूक प्रक्रियेत बदलावर करा विचार

SCROLL FOR NEXT