Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level : कोरड्या प्रकल्पाच्या संख्येने शंभरी ओलांडली

Water Shortage : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असतानाच मराठवाड्यातील जल संकट ही भीषणतेच्या दिशेने वाटचाल करते आहे. मराठवाड्यातील कोरड्या पडलेल्या प्रकल्पांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असतानाच मराठवाड्यातील जल संकट ही भीषणतेच्या दिशेने वाटचाल करते आहे. मराठवाड्यातील कोरड्या पडलेल्या प्रकल्पांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. कोरड्या पडलेल्या प्रकल्पांमध्ये १०० लघु तर ४ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. शिवाय २९३ लघु, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

उन्हाळ्याची आणखी चार महिने जाणे बाकी असतानाच मराठवाड्यातील बहुसंख्य पाणी साठ्यांची वाटचाल तळाच्या दिशेने सुरू आहे. संपूर्ण ८७७ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ २५ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्यातही लघु, मध्यम प्रकल्पाची अवस्था बिकट आहे.

७५ मध्यम प्रकल्पात तसेच ७४९ लघु प्रकल्पात सरासरी १३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठा प्रकल्पात ३० टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २७ टक्के तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये केवळ १८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील २४ मध्यम व २७९ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघु प्रकल्पांमध्ये धाराशिवमधील ९३, लातूरमधील ५५, बीडमधील ४८, छत्रपती संभाजीनगरमधील ३१, जालन्यातील १५, परभणीतील १६, हिंगोलीतील ५, नांदेडमधील ६ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या २४ मध्यम प्रकल्पांमध्ये धाराशिवमधील १०, जालना व लातूरमधील प्रत्येकी ३, नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी १ तसेच बीड मधील ६ मध्यम प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

सीनाकोळेगाव, माजलगाव मृतसाठ्यात

मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी प्रकल्पात २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून माजलगाव व सीना कोळेगाव प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. मांजरा प्रकल्पात १० टक्के, निम्न तेरणामध्ये ६ टक्के, निम्न दुधनामध्येही १० टक्के, निम्न मनारमध्ये ३४ टक्के, विष्णुपुरीत ४८ टक्के, उर्ध्व पैनगंगा मध्ये ५७ टक्के तर सिद्धेश्वर मध्ये ५७ टक्के व येलदरी प्रकल्पात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT