Water Crisis : उमरग्यात पाणीटंचाईच्या झळा

Water Shortage : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले.
Water Issue
Water IssueAgrowon

Dharashiv News : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाने १ ऑक्टोबर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीपर्यंत पाणीटंचाई निवारणासाठी ८ कोटी ८९ लाख रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला आहे.

दरम्यान  तालुक्यातील ३१ गावात ७१ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तर कडदोऱ्यासाठी एक टँकर सुरु करण्यात आले आहे. अधिग्रहणाचे आणखी दहा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहेत. उमरगा तालुक्यात सातत्याने अवर्षणस्थिती झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेल्याने २०१९ मध्ये तर फेब्रुवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणीटंचाईसाठी ६४ गावात अधिग्रहण व टँकरसाठी दोन कोटी २९ लाख रुपये खर्च झाला होता.

Water Issue
Sangli Water Shortage : कृष्णा कॅनलमध्ये पाणी न सोडल्यामुळे पाणी टंचाई

२०२० दीड कोटी रुपये खर्चाचा कृती आराखडा होता. २०२१ पासून मात्र पाणीटंचाई कमी होत गेली. तेंव्हापासून पाणीटंचाईचा प्रश्न काही मोजकी गावे वगळता प्रकर्षाने जाणवला नाही. यंदा मात्र ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अधिग्रहणाचे ७१ प्रस्ताव मंजूर

अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणी स्त्रोत कोरडेठाक पडताहेत. यापुढील तीन महिन्यात तर पाणी टिकण्याची शाश्वती दिसत नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या प्रखर झळा बसताहेत. प्रशासनाने १ ऑक्टोबर ते ३० जूनपर्यंत प्रस्तावित ९४ गावे, ५० वाडी - तांड्यासाठी १६९ खाजगी विहिर अधिग्रहणासोबतच धरणामध्ये चर खोदणे, सार्वजनिक विहीर खोल करणे, टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे,

Water Issue
Panchganga River : पंचगंगा तिसऱ्यांदा कोरडी, धरणातून पाणी सोडले तरी नागरिकांना पाणी टंचाई

नळ योजना, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करणे, नविन विंधन विहीर व कूपनलिका घेणे, तापूरत्या पूरक नळ योजना आदी उपाययोजनांसाठी ८ कोटी ८९ लाख ४४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला आहे. दरम्यान तहानलेल्या ३१ गावात ७१ अधिग्रहणाद्वारे पाणी दिले जात असून कोराळ, कडदोरा येथे टँकरसाठीचे  दोन प्रस्ताव दाखल होते. त्यापैकी कडदोरा येथे टँकर मंजूर करण्यात आले आहे. सोमवारपासून (ता. १७) तेथे पाणी देण्याची व्यवस्था सुरु होईल. मंजुरीच्या प्रक्रियेत असलेले काही प्रस्ताव तहसील कार्यालय, भू वैज्ञानिक विभागाकडे प्रमाणपत्रासाठी तर काही प्रस्ताव पाणी पंचनाम्यासाठी पाठवले आहेत.

उमरगा शहरात पंधरा दिवसांत पाणी

उमरगा शहरात सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा धरणातून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना आहे. मात्र योजनेतील जलवाहिनीच्या फुटीची समस्या नेहमी असते. परिणामी पाणी पुरवठ्यात विस्कळीतपणा येत आहे.

५४ योजनांचे काम सुरू

ग्रामीण भागात ५४ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ४७ कोटी ३ लाखांचा निधी मंजूर आहे. या सर्व कामांसाठी कार्यारंभ आदेश दिलेला आहे. त्यातील प्रगतीपथावर असलेल्या ४४ कामांसाठी आत्तापर्यंत १६ कोटी रुपये देण्यात आले आहेत. चार योजनेचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. दरम्यान सद्यस्थितील पाणीटंचाईमुळे योजनेचे काम गतीने होणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com