Dr Indra Mani Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Importance : नवीन शैक्षणिक धोरणामुळे ‘कृषितंत्र’चे महत्त्व वाढेल

Dr. Indra Mani : कृषितंत्र विद्यालयांमध्ये विशेष प्रावीण्य असणारे कृषी तंत्रज्ञान शिक्षण शिकविण्याची व्यवस्था व्हावी. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्याच भागात रोजगाराची संधी मिळेल,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : ‘‘नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणामध्‍ये कौशल्‍य आधारित पदवी अभ्यासक्रमास महत्त्व दिले आहे. त्यामुळे कृषितंत्र अभ्‍यासक्रमांचे महत्त्व वाढेल. प्रत्येक कृषितंत्र विद्यालयांमध्ये विशेष प्रावीण्य असणारे कृषी तंत्रज्ञान शिक्षण शिकविण्याची व्यवस्था व्हावी. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्याच भागात रोजगाराची संधी मिळेल,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निम्नस्तर कृषी शिक्षण विद्याशाखेतर्फे मराठवाडा विभागातील संलग्न कृषितंत्र विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाला शुक्रवारी (ता.१) व शनिवारी (ता.२) करण्यात आले. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले,

संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव पुरभा काळे, विद्यापीठ नियंत्रक प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. गजेंद्र लोंढे, कृषितंत्र विद्यालयांचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे (अंबाजोगाई), डॉ. अशोक घोटमोकुळे (लातूर), डॉ. पंडित मुंडे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. प्रल्हाद जायभाये (जालना), डॉ. संतोष पिल्लेवाड (परभणी) आदी उपस्थित होते.

डॉ. खोडके म्हणाले, ‘‘कृषितंत्र विद्यालयातील अभिलेखे व अभ्यासक्रम या दोन्ही बाबतीत आयोजिल्या या प्रशिक्षणातून निम्नस्तर कृषी शिक्षण अभ्यासक्रमाला ऊर्जित अवस्था प्राप्त होईल.’’

डॉ. लोंढे म्हणाले, ‘‘मराठवाड्यातील ५७ कृषितंत्र विद्यालयांमध्ये दरवर्षी जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी हे कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Groundwater Management: भूजलाचा वापर हवा जपूनच

Khaparkheda Pollution Case: प्रदूषणामुळे खापरखेडा ग्रामस्थांचे स्थलांतर

Shetkari Hakk Morcha: कापूस, सोयाबीन, तुरीला भावासाठी बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चा

Wheat Variety: ‘फुले समाधान’ गहू वाणाची कुंदेवाडीत विक्रमी २५ टन विक्री

Moneylender Surrender: फरार सावकाराची अखेर शरणागती

SCROLL FOR NEXT