Summer Crops
Summer CropsAgrowon

Summer Crops : तीन जिल्ह्यांत सरासरीच्या १९ टक्केच उन्हाळी पिके

Sowing Update : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत उन्हाळी पेरणीला सुरवात झाली आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत उन्हाळी पेरणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास ६ हजार २०४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १९ टक्के इतकी आहे.

आधी खरीप व नंतर रब्बी हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. त्याचा थेट परिणाम दोन्ही हंगामातील पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उन्हाळी हंगाम क्षेत्र १४ हजार ९०३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३०४२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात उन्हाळी मका १४०२ हेक्टर, बाजरी १२८३ हेक्टर, भुईमूग १३५ हेक्टर, सूर्यफूल २९ हेक्टर तर २२ हेक्टरवर सोयाबीन क्षेत्र आहे.

Summer Crops
Summer Crop Cultivation : तीन हजार हेक्टरवर ज्वारी, तीळ, बाजरीची लागवड

जालना जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र १० हजार २९८ हेक्टर असून प्रत्यक्षात ५७३ हेक्टर क्षेत्रावरच उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात १५८ हेक्टर मका, २७० हेक्टर बाजरी, ६९ हेक्टर भुईमूग, ५८ हेक्टर सोयाबीन तर केवळ २ हेक्टरवर सूर्यफूल आहे.

Summer Crops
Summer Sowing : उन्हाळी पेरण्यांना सुरुवात

बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र ७४५५ हेक्टर आहे. प्रत्यक्षात २५८८ क्षेत्रावरच उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात ३८८ हेक्टर मका, १८१७ हेक्‍टर बाजरी, ३३० हेक्टर भुईमूग तर २५ हेक्टरवर सोयाबीन पीक आहे.

गारपिटीने १३ हजार ३६६ हेक्‍टर पिकांचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण सात लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आठ लाख ९१ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील १३ हजार ३६६ क्षेत्रावरील रब्बी पिकांचे गारपीट व वादळी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७६४ क्षेत्रासह जालना जिल्ह्यातील ११ हजार ६०२ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com