Healthy Fruits Agrowon
ॲग्रो विशेष

Healthy Diet : रोगप्रतिकारासाठी पौष्टिक आहाराची गरज

Nutritious Diet : रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आदी आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजारांपासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी पौष्टिक आहार घेतला पाहिजे.

Team Agrowon

गणेश गायकवाड, डॉ. राजेश क्षीरसागर

Diet for Immunity : पावसाळ्याच्या दिवसात बदललेले वातावरण तसेच दूषित पाणी, खाण्यातून आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विशेषतः ऋतू बदला नंतर डेंग्यू आणि पोटाचे विकार दिसतात. या आजारपणाचे कारण म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक्षमता चांगली नसते हे आहे. सध्या ऊन-पावसामुळे देखील प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होत आहे. या काळात औषधांबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक आजार हे जीवन शैलीशी निगडित असल्याचे संशोधनातून सातत्याने पाहायला मिळाले आहे. त्यामुळे जीवनशैलीत बदल घडवून आणि त्याद्वारे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ करून आजारांना प्रतिरोध करून निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे.

आधुनिक जीवनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे शांतता आणि, विश्रांतीचा अभाव. पौष्टिक आहार म्हणजे काय, याचा विचार न करता समोर येईल तो चमचमीत पदार्थ जिभेचे चोचले पुरवून, पोटात ढकलून पोट भरण्याकडे अनेकांचा कल असतो. वडा-पाव, भजी-पाव, मिसळ, बर्गर, पिझ्झा हे सहज उपलब्ध असलेले पदार्थ तेवढ्याच सहजतेने खरेदी केले जातात. आपण हे पदार्थ कोणत्या पद्धतीने आणि कोणते घटक वापरून केले आहेत याचा विचार करत नाही.

काही वेळा स्वच्छता देखील पाळलेली नसते. दूषित अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे आजार होतात. जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी रोगप्रतिकारक शक्ती भक्कम बनवणे हा उपाय आहे. कार्बन उत्सर्जनामुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे प्रौढ व्यक्तींमध्ये आणि मुलांमध्येही सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप हे आजार सर्वसामान्य असल्याचे डॉक्टर सांगतात. याखेरीज संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. वाढत्या प्रदूषणाबरोबरच बैठे कामकाज आणि व्यायामाचा अभाव हे घटक कारणीभूत आहेत.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे उपाय

ठराविक वातावरण किंवा पदार्थ यांच्या सान्निध्यात सातत्याने आल्यामुळे शरीरात विशिष्ट बदल घडून येतात आणि त्यामुळे त्याविषयी ही रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते. ही शक्ती एकतर शरीरात आपोआप तयार होते किंवा लस दिल्यामुळे तयार होते. माणसाला कोणताही आजार झाला तरी त्यानुसारच्या लसींमुळे रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करता येऊ शकते.

काळजी करत राहण्यापेक्षा असे आहार विहारातील नियम पाळून आपण आपले आरोग्य नक्कीच निरामय ठेऊ शकतो. तेव्हा योग्य आहार घ्या, प्रदूषणापासून दूर रहा आणि नियमितपणे व्यायाम करा आणि छोट्यामोठ्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवा.

रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आदी आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे. जीवनसत्त्वयुक्त आणि खनिजांचा पुरेसा पुरवठा करणारा आहार महत्त्वाचा आहे.

हिरव्या पालेभाज्या, पचायला हलके पदार्थ

आहारात ज्यातून संसर्ग होणार नाही अशा पदार्थांची निवड करावी. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ताज्या हिरव्या पालेभाज्या, स्वच्छ धुतलेली फळे, शेंगभाज्या सर्वोत्तम आहेत.

पालक मध्ये फोलिक अॅसिड असते

जे शरीरात नवीन पेशी बनवण्यासाठी आणि जुने पेशी चांगले करण्यासाठी उपयोगी आहे. पालकामध्ये तंतूमय घटक, लोह आणि जीवनसत्त्व क

असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

ऋतूनुसार मिळणाऱ्या पालेभाज्या आणि फळे आवर्जून खावीत. पचायला हलके पदार्थ आहारात निवडावेत.

नवजात बालकांसाठी आईचे दूध हे रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. जे बालकास अॅलर्जी, ताप, जुलाबापासून वाचवते.

दही सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचनशक्ती व्यवस्थित करण्यासाठी उपयोगी ठरते.

कठीण कवचाच्या फळांचे सेवन करावे. बदामामध्ये जीवनसत्त्व अ जास्त असते. बदाम आणि एखादे अक्रोड खाण्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

मूग, मटकी, हुलगे, आदी कडधान्ये पचायला सोपी आहेत, डाळी मऊ शिजवून घ्याव्यात.

योग्य प्रमाणात पाणी पिण्याकडे लक्ष ठेवावे. उकळून घेतलेले पाणी घ्यावे, तहान लागत नसली तरी हायड्रेशन रोखणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात आहाराबरोबर व्यायाम महत्त्वाचा असतो. आपली व्यायामाची गरज किती हे ओळखून व्यायाम करावा.

रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचे उपाय

लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने शरीराला फार मदत मिळते कारण त्यात जीवनसत्त्व क असते.

या फळांमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटसमुळे वजन घटते.

संत्री, लिंबू, मोसंबी, आवळा यासारख्या फळांना पावसाळ्यात प्राधान्य द्यावे. ही फळे तंतुमय पदार्थ चांगले स्रोत आहेत. लिंबूवर्गीय फळे तुलनेने कमी ग्लिसकेमिक इंडेक्स स्कोअर असतात.

लसूण

लसणामधील घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवितात. लसणामध्ये जीवनसत्त्व अ, सल्फर आणि झिंक असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर असते.

वजन कमी होण्यास, सर्दी आणि फ्लू रोखण्यासाठी मदत होते. चयापचय क्रिया चांगली होते.

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये भरपूर जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. ईजीसीजी हे अँटिऑक्सिडंट जास्त असल्याने नियमित व्यायामादरम्यान चयापचय दर वाढतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ग्रीन टी उपयोगी आहेत.

गणेश गायकवाड, ९८५०२३६३८०

(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT