Group Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Group Farming : भविष्यात शेती, शेतकरी वाचविण्यासाठी गटशेतीची गरज

Group Farming Update : देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. त्यामुळे देशातील ३५ कोटी नागरिकांची अन्नधान्याची व्यवस्था कशी करायची, या विवंचनेत तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी होत्या.

Team Agrowon

Nashik News : ‘‘देशात १९६० नंतर झालेल्या हरितक्रांतीने शेतकऱ्यांत आत्मनिर्भरता, सुबत्ता आली. देश आज बहुसंख्य कृषी उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण झाला असला तरी पाण्याची घटती उपलब्धता, जमिनीची घसरलेली सुपीकता, पिकांना भाव नाही, जमिनीचे छोटे तुकडे व शेतीसाठी मजुरांचा अभाव आदी प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहेत.

यावर मात करून बळीराजाच्या उन्नतीसाठी भविष्यात गटशेती हाच उत्तम पर्याय असेल,’’ असे ठाम मत कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी मांडले.

बुधवारी (ता. १०) नाशिक शहरातील गंगाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेतील दिवंगत प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यानात ‘भविष्यातील भारतीय शेती’ वर डॉ. मायी बोलत होते.

डॉ. मायी म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. त्यामुळे देशातील ३५ कोटी नागरिकांची अन्नधान्याची व्यवस्था कशी करायची, या विवंचनेत तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी होत्या.

मात्र त्यानंतरच्या हरितक्रांतीने खऱ्या अर्थाने देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. परंतु नंतरच्या काळात शेतीक्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकरी व शेती वाचविण्यासाठी गटशेतीशिवाय पर्याय नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season: जळकोटमध्ये उसाचे क्षेत्र वाढणार

Jowar Pest Management: रब्बी ज्वारीवरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सोप्या २ पद्धती

Traffic Diversion: अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Solar Pump Complaints: सौर पंपाबाबतच्या तक्रारींचे होणार निवारण

MGNREGA Congress protest : मनरेगासाठी काँग्रेसचे आंदोलन; ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाओ’ अभियान

SCROLL FOR NEXT